आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाची तयारी केली, पण पावसाने उद्ध्वस्त केले; चिनी दांपत्याचेे कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेनान (चीन ) - चीनमधील या दांपत्यासाठी हा सर्वात वाईट अनुभव होता. कोणालाही दुःखच झाले असते. अनेक महिन्यांपासून ते लग्नाची तयारी करत होते. ३०० पेक्षा अधिक लोकांना निमंत्रण दिले. शाही हॉटेल, लिमोझिन, फटाके सर्व तयारी जय्यत झाली होती. आयत्या वेळी पाऊस आणि पूर आल्याने सर्व उद्ध्वस्त झाले. वधू झोऊ टियानने प्रेमळ शब्दांनी या प्रसंगाला दोघांसाठी संस्मरणीय बनवले.

झोऊने आपल्या भावी पती वांग लीला सांगितले, ‘मला अजिबात खेद नाही. तू माझ्यासोबत आहेस. त्यामुळे मी जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती आहे. मला दिखाऊपणाची गरज वाटत नाही.’ त्या वेळी वांगसोबत असलेले सर्व जण भावुक झाले. झोऊ आणि वांग यांनी मिळून लग्नाची सर्व तयारी केली होती. प्रत्येक विधीसाठी त्यांनी खास नियोजन केले होते. मात्र, आयत्या वेळी पावसाने सर्व उत्साहावर विरजण पडले.
अनेक अडथळ्यांना पार करत वांग नातलगांसह विवाहस्थळी पोहोचले. तेथील दृश्य पाहून ते हबकूनच गेले. निमंत्रित येण्याचा तर पत्ताच नव्हता. कोणी स्वागताला नाही, कोणी व्यवस्थापक नाही. कोणी तिथपर्यंत येणेही अशक्य होते. संततधार सुरूच होती. दुपारपर्यंत पाऊस सुरूच राहिला व नंतर वाढला. वांगने सर्व परिस्थिती ही झोऊला संदेशाद्वारे कळवली. त्याला अश्रू अनावर झाले. या खास दिवसाची आपण उत्कटतेने वाट पाहत होतो, असे झोऊला वाटले. हा दिवस असाच गमावता कामा नये.
दुपारी १.३० वाजता वांग झोऊच्या घरी पोहोचला. त्याच्यासोबत कोणीच नव्हते. त्याने झोऊला सोबत चलण्यास सांगितले. कमी साहित्यातच मेकअप आर्टिस्टने झोऊचा मेकअप केला. तिला वेडिंग गाऊन घातला. दोघे विवाहस्थळी पोहोचले. केवळ १० लोक होते. रिकाम्या हॉलमध्येच त्यांनी परस्परांना अंगठ्या घातल्या. दोघांनी विवाह नृत्यही केले. साध्या सोहळ्यात त्यांनी आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन घेतले. झोऊने वांगला जे म्हटले ते मेकअप आर्टिस्टने एेकले होते. वांग तिच्या घरी आलेला पाहून ती खुश झाली. त्याला मिठी मारत म्हणाली, ‘निमंत्रित येणार नाहीत हे फारसे महत्त्वाचे नाही. आलिशान गाडी, बँडबाजा नाही याचा मला खेद नाही. तू माझ्यासोबत आहेस हेच सर्वात महत्त्वाचे. मी आनंदी आहे. तू सध्या नवऱ्या मुलासारखा दिसत नाहीस; पण तू माझ्यासोबत आहेस हे महत्त्वाचे.’ त्याने हे सर्व संवाद सोशल मीडियावर टाकले. देशभरात हा संदेश व्हायरल झाला. तरुणांसाठी हे दांपत्य उदाहरण आहे अशी प्रशंसा सर्वत्र झाली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या विवाहसोहळ्याचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...