आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचे मोलकरणीशी सूत; पोपटाने सांगितले, पोलिसांनी मानला नाही पुरावा, पती वाचला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुवेत- कुवेतमध्ये एका पोपटाने आगळावेगळा कारनामा करून दाखवला. येथील एका महाशयाचे घरातील कामवालीशी लफडे होते. पत्नीच्या अनुपस्थितीत दोघे तासन््तास प्रेमाच्या गुजगोष्टी करत. हे प्रेमळ संवाद घरात असलेला पोपट गुपचूप ऐकत असे. हे संवाद ऐकून तो सर्व गोष्टी चांगला लक्षातही ठेवत होता.

एक दिवस पत्नी घरात येताच पोपट काही वेळेपूर्वी ऐकलेल्या गोष्टी फटाफट पत्नीला सांगू लागला. पोपटाच्या तोंडून ही प्रेमकथा ऐकून पत्नीलाही आश्चर्य वाटले. खरे तर पत्नीला आपला पती आणि कामवालीबद्दल पूर्वीपासूनच संशय होता. कारण, अचानक ती घरी आली की अनेकदा पतीच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असायचे. आता घरातील पोपटाने तर तिला पुरावेच दिले होते. आता तिला पती-कामवालीच्या प्रेमसंबंधांची खात्रीच पटली होती. तिने पोपटालाच साक्षीदार करून पोलिसांत तक्रार केली. आखाती देशांत अशा विवाहबाह्य संबंधांसाठी तुरुंगवास आणि इतर शिक्षांची तरतूद आहे.

या खटल्यात आरोपी पतीला नशिबानेच साथ दिली असे म्हणावे लागेल. कारण, पोलिसांनी पोपटास विश्वासार्ह पुरावा मानण्यास नकार दिला. हा पुरावा ग्राह्य धरला गेला असता तर पतिराज तुरुंगात असते. पोपट सांगतो आहे ते पतीच्या तोंडून ऐकलेले आहे की एखाद्या टीव्ही किंवा व्हिडिअाेतून ऐकलेेले आहे हे सिद्ध करणे कठीण आहे, असे पोलिसांचे म्हणणे होते. म्हणूनच पोपटाला विश्वासार्ह पुरावा मानले गेले नाही.

यापूर्वीही अशी प्रकरणे
यापूर्वीसन २००६ मध्ये एका पोपटाने आपली मालकीण सूजीचे असलेले अनैतिक संबंध प्रकाशात आणले होते. गेल्या ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्येही एका पोपटालाच ठाण्यात पाचारण करण्यात आले हाेते. एका वृद्ध महिलेने तिच्या घरातील पोपट अश्लील शिव्या देत असल्याचा आरोप केला होता. आपल्या सावत्र मुलानेच पोपटाला या शिव्या शिकवल्या असल्याचा आरोप महिलेने केला होता. ठाण्यात पोलिसांसमोर मात्र या हुशार पोपटाने मौन पाळले होते. पोलिसांनी या प्रकरणी पोपटासह तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली होती.
बातम्या आणखी आहेत...