आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया: हॉस्पिटलमध्‍ये भीषण आग, 22 रुग्णांचा जळून मृत्यू, 20 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियामध्‍ये रविवारी एका न्यूरोलॉजिकल हॉस्पिटलला आग लागली. या आगीत 22 जण जळून ठार झाले आहेत. तर, 20 पेक्षा अधिक गंभीर जखमी असल्‍याची माहिती आहे. हे हॉस्पिटल मध्‍य रशियाच्‍या वोरोनेज प्रांतातील आहे. खराब वायरींगमुळे ही आग लागल्‍याचे सांगितले जात आहे.
कशी घडली दुर्घटना ?
-हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार, इलेक्ट्रिकल सिस्टममध्‍ये बिघाड असल्‍याने ही दुर्घटना झाली असावी.
-ही आग हॉस्‍पिटलमध्‍ये सुमारे 600 चौरस फुट परिसरात पसरली होती.
- या आगीत एका मजल्‍याचे छतही कोसळले आहे.
- लोकल इमरजेंसी मिनिस्ट्रीने वायरींगमधील खराबी बरोबर हॉस्‍पिटल प्रशासनाचे दुर्लक्ष यासाठी कारणीभूत असल्‍याचे सांगितले.
-आपत्‍कालिन बचाव पथक त्‍वरित घटनास्‍थळी दाखल झाले व मदतकार्याला सुरूवात झाली.
हॉस्‍पिटलमध्‍ये होते 70 जण
-न्यूरोलॉजिकल हॉस्पिटलमध्‍ये ही आग लागली तेव्‍हा आत 70 जण उपस्‍थित होते. त्‍यामध्‍ये चार मेडिकल स्‍टाफ होते. यापैकी 29 रूग्‍ण होते. आग लागली तेव्‍हा हे रूग्‍ण बेडवरून उठू शकत नव्‍हते.
- बचाव पथकातील जवानांनी माहिती दिली की, आग लागल्‍यानंतर 57 जणांना इमारतीतून बाहेर काढण्‍यात आले.
-19 लोकांचे मृतदेह घटनास्‍थळी आढळले तर, तीन गंभीर जखमींचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, दुर्घटनेचे फोटो, अखेरच्‍या स्‍लाइडवर VIDEO..