आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या युवतीने केले कॅन्सर पीडित ओमारशी लग्न, तीसऱ्याच दिवशी झाला मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- आपल्याला कॅन्सर झाला आहे हे समजल्यावर 16 वर्षीय ओमार अल शेख याला जबर धक्का बसला. त्याच्या आयुष्यात आता काहीच क्षण शिल्लक होते. त्याने गर्लफ्रेंड एमीसोबत काही आनंदाचे क्षण घालविण्याची इच्छा बोलून दाखवली. एमीने स्वच्छेने हे नाते स्वीकारले.
फुलांनी सजविण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या बेडवर त्याने एमीला रिंग घातली. या लग्नाला दोन्ही कुटुंबातील लोक उपस्थित होते. यावेळी एमीने पिंक कलरचा गाऊन घातला होता.
लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी ओमारचे निधन झाले. यावेळी त्याची आई मीराबेल हिने म्हटले, की ओमार गेल्याचे मला अतिव दुःख आहे. पण एमी सारखी चांगली सून मिळाली आहे. दोघांचे एकमेकांवर खुप खुप प्रेम होते.
पुढील स्लाईडवर बघा, केवळ तीन दिवस वैवाहिक आयुष्य जगलेल्या ओमारचे आणि त्याच्याशी लग्न करणाऱ्या धाडसी एमीचे फोटो....