आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेशमध्ये हल्ल्यात हिंदू पुजाऱ्याची हत्या, दोन दिवसांत तीन हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- बांगलादेशमध्ये शुक्रवारी तीन इस्लामिक कट्टरवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका हिंदू पुजाऱ्याचा मृत्यू झाला. झेनाइदाह जिल्ह्यात ५० वर्षीय शामनंदो दास यांची हत्या झाली. त्याचबरोबर ढाक्यातील रामकृष्ण मठाच्या प्रमुखासही जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

दास मंदिर उद्यानात पूजेची तयारी करत असताना शामनंदो यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी पुजाऱ्याची गळा चिरून हत्या केली.ते राधामोहन गोपाळ मठात पुजारी म्हणून काम करत होते. हत्येेचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गेल्या दोन दिवसांत तीन जणांच्या हत्या झाल्या आहेत, हे विशेष. काही दिवसांपूर्वी रामकृष्ण मठाच्या प्रमुखांनाही जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. बांगलादेशातील हिंसाचारात वाढ झाली आहे.

रेस्तराँजवळ गोळीबार
शुक्रवारीरात्री साडेनऊच्या सुमारास राजधानीतील प्रसिद्ध आर्टिसन बेकरी रेस्तराँमध्ये पाच शस्त्रधारी घुसले. त्यांच्या गोळीबारात ठार झाले. त्यात रेस्तराँचा मालकही जखमी झाला. रात्री उशिरापर्यंत पोलिस हल्लेखोरांत धुमश्चक्री सुरू होती. बांगलादेशमधील हा अत्यंत गजबजलेला परिसर अाहे. या भागात परदेशी पर्यटकांचीही वर्दळ असते. काही नागरिकांना हल्लेखोरांना आेलिस ठेवले असावे.
बातम्या आणखी आहेत...