आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सेल्फी घेऊ न दिल्याने एका पर्यटकाने दुसऱ्याला नदीत फेकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी (ऑस्ट्रेलिया)- सिडनी हार्बर परिसरातील एका बोटवर सेल्फी घेण्यावरुन दोन पर्यटकांमध्ये चांगलेच भांडण झाले. त्याची परिणती हाणामारीत झाली. बोटवरील वातावरण तणापूर्वक झाले. पण त्यानंतर जे काही झाले त्याची कल्पनाही कुणी केली नव्हती. एका पर्यटकाने दुसऱ्याला चक्क नदीत फेकले. त्याला पोहता येते की नाही याचा जराही विचार केला नाही.
भांडण करणाऱ्या पर्यटकांपैकी एक अमेरिकी आणि दुसरा जपानी असल्याचे वृत्त आहे. दोघांमध्ये प्रारंभी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर हाणामारी सुरु झाली. दोघे सेल्फी स्टिकने एकमेकांना मारहाण करताना व्हिडिओत दिसून येतात. त्यानंतर जपानी पर्यटकाने अमेरिकी पर्यटकाला उचलून नदीत फेकले. या प्रकाराने बोटवर उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांना चांगलाच धक्का बसला. ही संपूर्ण घटना ब्रिटिश पर्यटकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...