आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DREAM JOB: 6 महिने खा-प्या-मज्जा करा, वरून 40 लाख कमवा; असा करा अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - ड्रीम जॉबचा शोध घेत असाल तर ही संधी तुमच्यासाठी आली आहे. मेक्सिकोच्या बीच सिटीवर फक्त 6 महिने राहून तुम्हीही 60 हजार डॉलर अर्थात 40 लाख भारतीय रुपये कमवू शकता. ही जॉब ऑफर कँकन शहरातील एक टूरिस्ट वेबसाइट देत आहे. कँकम एक्सपीरियन्स ऑफिसर असे या पदाचे नाव आहे. निवड झालेल्या उमेदवाराला शहराची प्रसिद्धी करावी लागणार आहे. या व्यतिरिक्त शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि विविध टूरिस्ट स्पॉटला भेट देऊन आपला अनुभव व्यक्त करावा लागेल. विशेष म्हणजे, हे सर्व करताना तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. तुमचे सगळेच खर्च ही वेबसाइट उचलणार आहे. 
 
असे करू शकता नोकरीसाठी अर्ज
- विशेष म्हणजे, या जॉबसाठी काही खास अनुभवाची अट ठेवण्यात आलेली नाही. सोबतच उमेदवाराने पद्वीधर असणे किंवा पात्रता धारक असणे देखील आवश्यक नाही. 
- तरीही उमेदवारांना काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. मार्च 2018 पासून सुरू होणारी ही जॉब ऑगस्ट 2018 पर्यंत चालणार आहे. 
- यात सर्वप्रथम उमेदवाराला आपला एका मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करावा लागणार आहे. त्यामध्ये आपली वैशिष्ट्ये आणि जॉब का हवी हे सांगावे लागणार आहे. 
- यानंतर जनमताच्या माध्यमातून 5 सर्वोत्तम व्हिडिओ निवडले जातील. त्या पाच जणांना मुलाखतींसाठी बोलावले जाणार आहे. 

लोकप्रिय पर्यटन स्थळ बनवण्याचे उद्दिष्ट...
- वेबसाइटचे महाव्यवस्थापक चाड मेअरसन यांनी सांगितल्याप्रमाणे, कँकन शहराला जगभरात लोकप्रीय पर्यटन स्थळ बनवणे हा आमचा हेतू आहे. साऱ्या जगातून पर्यटकांनी या शहरात येऊन गर्दी करावी अशी आमची इच्छा आहे. 
- जॉब करताना कँकन एक्सपीरियंस ऑफिसरला केवळ याच शहराचे सुंदर फोटोज, व्हिडिओज आणि अनुभव सोशल मीडियावर शेअर करून प्रसिद्धी करावी लागणार आहे. जेणेकरून जास्तीत-जास्त लोक या शहराकडे आकर्षित होतील आणि पर्यटनात वाढ होईल. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतकी सुंदर आहे मेक्सिकोची ही बीच सिटी...
बातम्या आणखी आहेत...