आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या स्फोटानंतर अॅपल ‘आयफोन 7’ला आग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क  - ‘गॅलक्सी नोट-७’ नंतर आता अॅपलच्या ‘आयफोन - ७’ मध्ये आग लागण्याची घटना घडली आहे. ब्रियाना ओलिवास यांनी बुधवारी आपल्या फोनच्या जळण्याचा व्हिडिओ टि्वटवर टाकला आहे. मोठा आवाज झाल्यानंतर फोनमधून धूर निघायला लागला होता असा दावा त्यांनी केला आहे. यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी अॅपलने विशेष तपास पथक नेमले आहे. 
 
यासंबंधी आलेल्या माहितीनुसार ब्रियाना यांच्या फोनमध्ये काही अडचणी येत होत्या. त्यामुळे ते या फोनला स्टोअरमध्ये घेऊन गेले होते. दुरुस्तीनंतर ते फोन पुन्हा घरी घेऊन गेले. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी आग लागण्याची घटना घडली. अॅपलचे आयफोन - ७ आणि ७ प्लस या दोन्ही फोनची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबरपासून सुरू झाली होती.
 
 त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातच ऑस्ट्रेलियामधील एका आयफोन - ७ मध्ये आग लागण्याचे वृत्त आले होते. यामुळे ग्राहकाच्या कारचेही नुकसान झाले होते. गेल्या वर्षी गॅलक्सी नोट-७ मध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सॅमसंगने विक्री झालेले सर्व फोन परत बोलावले होते.  
 
‘मोबाइल वर्ल्ड काँग्रेस’, एलजीच्या जी-६वर लक्ष  
बार्सिलोनामध्ये २७ फेब्रुवारीपासून ते दोन मार्चपर्यंत ‘मोबाइल वर्ल्ड काँग्रेस’ आहे. प्रमुख फोन कंपन्या यात सहभागी असतील.

- सॅमसंग : गॅलेक्स टॅब एस-थ्री सादर करणार आहे. गॅलेक्सी एस - ८ ची अपेक्षा कमीच आहे.  
- एलजी : ५.७ इंच स्क्रीनचा जी-६ फोन आणेल. स्क्वेअर कॅमेरा फीचर आहे.  
- नोकिया : ३३१० पुन्हा आणेल. त्याच्या आधी अँड्रॉइड फोन नोकिया-६ ची झलक दिसेल.  
- झेडटीई : एक जीबी डाऊनलोड स्पीडचा ‘गीगाबिट’ आणि अपग्रेडेड ‘अॅक्सॉन ७’ येणार आहे.  
- नूबिआ : २३ एमपी कॅमेरा असणारा झेड११ आणि झेड ११ मिनी एस मिळेल.  
- हुवावे : पी-१०, पी-१० प्लस व पी-१०  
- मोटोरोला : जी-५ व जी -५ प्लस  
 
 
बातम्या आणखी आहेत...