आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी तुमचा तिरस्कारही करणार नाही, तुमचा पराजय अटळ, पतीचे दहशतवाद्यांना भावुक पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अँटोइन लेइरिस यांनी त्यांची पत्नी गमावली. दहशतवाद्यांच्या या कृत्यामुळे मानसिकदृष्ट्या खचून गेल्यानंतरही लेइरिस यांनी त्यांच्यातील संवेदनशीलता जपली आहे. या घटनेनंतर त्यांनी दहशतवाद्यांच्या नावाने सोशल मीडियावर पत्र पोस्ट केले असून त्यात तुम्ही माझ्या तिरस्काराच्याही लायकीचे नाहीत, तुमचा पराभव अटळ अाहे, हे मला माहीत आहे, असे भावनात्मक आवाहन केले आहे. अँटोइन लेइरिस यांनी पत्रात म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री तुम्ही माझ्या आयुष्यातून एका असामान्य व्यक्तीला माझ्यापासून हिरावले. माझ्या आयुष्यातून प्रेम माझ्या मुलाची आई. परंतु याउपरही तुम्ही माझ्या तिरस्कारासदेखील पात्र नाहीत. मी माझा तिरस्कार तुम्हाला भेट म्हणूनदेखील देणार नाही.

कारण रागासोबत तिरस्काराची भावना मला तुमच्यासारखीच बनवेल. लेइरिसने पुढे लिहिले आहे की, तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही मी ते जाणून घेऊ इच्छितदेखील नाही. तुम्ही मृत्यूचे ठेकेदार आहात. तुम्ही मला घाबरवू इच्छिता. परंतु तुम्हाला पराभूतच व्हावे लागेल. रात्र आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर मी शेवी सकाळी तिला (हल्ल्यात मारल्या गेलेल्या पत्नीला) पाहिले तेव्हा ती इतकी सुंदर दिसत होती की जसे शुक्रवारी सायंकाळी माझा निरोप घेताना होती. ती तितकीच सुंदर होती, जेव्हा बारा वर्षांपूर्वी मी तिच्या प्रेमात पडलो होतो. निश्चितच मी खूप दु:खी आहे, परंतु या छोट्या विजयासाठी मी तुम्हाला तसेच सोडून देतो. कारण हा तुमचा विजय अतिशय अल्पजीवी असेल. मीही जाणतो की ती दररोज आमच्यासोबत असेल आणि आम्ही दोघे एकमेकांना स्वर्गात भेटूच.

माझा मुलगा आणि मी जगातील सर्व सैनिकांच्या तुलनेत अधिक मजबूत आहोत. त्यामुळे तुमच्यावर मी माझा आणखी वेळ वाया घालवू शकत नाही. मला माझ्या मुलाजवळ परत जावे लागेल. तो झोपेतून उठला असेल. तो केवळ १७ महिन्यांचा आहे. तो रोजच्याप्रमाणे खाईल नंतर अाम्ही नेहमीप्रमाणे एकमेकांसोबत खेळत राहू.

भयभीत विद्यार्थी-मातापित्यांना सावरण्यासाठी शिक्षक सरसावले पॅरिसहल्ल्यानंतर सर्वात मोठे आव्हान लोकांना या धक्क्यातून बाहेर काढण्याचे आहे. ही जबाबदारी फ्रान्सच्या शिक्षकांनी स्वीकारली आहे. सर्व शाळांमधील प्रिन्सिपल, शिक्षक मुले त्यांच्या पालकांच्या मनात हल्ल्याबाबत बसलेली भीती कमी करण्यासाठी प्रयत्न करताहेत. मुलांना धीर देऊन त्यांच्या मनात आत्मविश्वास जागवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आई-वडिलांनी मुलांना शाळेत पाठवावे यासाठी त्यांचे मनोबल वाढवण्याचे कामही त्यांना करावे लागत आहे. माध्यमिकच्या शिक्षिका मेरी सेंड्रिन यांनी सर्व मुलांना ई-मेल मेसेज पाठवला आहे. त्यात त्यांनी जे मुक्त विचारांचे आहेत अशा सर्व मुले त्यांच्या आई-वडिलांचे स्वागत करण्यासाठी मी शाळेच्या प्रवेशद्वाराशी उभी आहे, असे म्हटले आहे.