आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-बाबा.. जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही माझ्यासोबत नव्हते, त्या क्षणांसाठी धन्यवाद; त्यामुळेच मी स्वावलंबी बनले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कॉटलंड- चेल्सा कॅमरनने (१८) आपल्या आईवडिलांना भांडताना पाहतच बालपण घालवले. त्यांना नशेत धूत पाहिले. अन्य मुलांप्रमाणे चेल्सालाही आईवडिलांसोबत हसायचे-बागडायचे होते. पण त्यांनी तिच्याकडे लक्षच दिले नाही. तिला एकटेच राहणे बाध्य झाले. रोजचा तमाशा पाहून हैराण झालेल्या चेल्साने वयाच्या १४ व्या वर्षी छोट्या भावासह घर सोडले. तेव्हापासून मित्र, नातेवाइकांकडे राहत आहे. भावाच्या शिक्षणासाठी अर्धवेळ नोकरी केली. आता चेल्साने आपल्या आईवडिलांना पत्र लिहिले. त्यात आईवडिलांची साथसंगत मिळाली नसल्याने मुलांना वाटते ती व्यथा कथन केली आहे. ती तिच्याच शब्दांत... 

आई-बाबा... मी तुमच्याशी मोकळे बोलू शकले नाही. आज बोलतेे. मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छिते. ड्रग्ज जीवन उद््ध्वस्त करते, कुटुंब तोडते हे मी तुमच्याकडून शिकले. ते माझ्या जीवनाचा भाग होऊ नये म्हणून हा धडा कायम लक्षात ठेवेन. जीवन निवडीवर अवलंबून असते. आपण जे निवडले तेच मिळते, हे तुम्हाला पाहून शिकले. त्यामुळे तुम्ही जे निवडले ते मी निवडणार नाही. तुमच्यामुळेच मी कमी वयात स्वावलंबी बनू शकले. हिंमतबाज व सहनशील बनले. सामान्य स्थितीत ते शक्य झाले नसते. जीवन नेहमीच इंद्रधनुष्याप्रमाणे नसते हेही मी शिकले. 
  
मला गरज होती तेव्हा तुम्ही माझ्यासोबत नव्हते, त्या प्रत्येक क्षणांसाठी धन्यवाद. माझा शाळेचा पहिला निकाल आला तेव्हा वेल डन म्हणायला तुम्ही नव्हते. स्कूलची हेड गर्ल बनण्याचे स्वप्न होते. मी बनले. पहिल्यांदा शेकडो लोकांसमोर भाषण दिले. बक्षीस मिळाले. लोकांनी टाळ्या वाजवल्या. माझी नजर तुम्हाला शोधत होती, पण माझ्या यशावर गर्व करायला तुम्ही तेथे नव्हते. तुम्ही माझ्या छोट्या भावाला जन्म दिला, पण नाव ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर सोडली. त्याच्या शाळेचा पहिला दिवस होता, तो तुम्हाला शोधत होता. मीच त्याला तयार केले व शाळेत नेलेे. तुमच्यासाठी हे काहीच महत्त्वाचे नव्हते.
   
एक दिवस तुम्ही जागे व्हाल व तुमच्यासाठी मित्र, प्रेम, खुशी अशा अनेक गोष्टी आहेत याची तुम्हाला जाणीव होईल, अशी अपेक्षा आहे. ज्या दिवशी असे होईल तेव्हा कृपया माझ्याकडे या. म्हणजे आपण सोबत मिळून जीवनाचा आनंद घेऊ शकू. मला जेथे जायला आवडते त्या जागा तुम्हाला दाखवेन. तुम्हाला जर्मनीला फिरायला घेऊन जाईन. तोपर्यंत त्या जीवनाचे स्वप्नच पाहते. आपण सगळे सोबत छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतो. ते जीवन कसे असेल या विचारानेच मी आनंदी होऊन जाते.
बातम्या आणखी आहेत...