आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियात आत्मघातकी हल्ल्यात 100 ठार, नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बसेसना केले लक्ष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरुत - सिरियामध्ये एका आत्मघातली कार बॉम्ब स्फोटात 100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमीही झाले आहेत. सरकारच्या ताब्यात असलेल्या 2 शहरांमधून सरक्षितपणे बाहेर काढल्या जाणाऱ्या नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बसेसना लक्ष्य करून हल्ला करण्यात आला. यात अनेक लहान मुलेही गभीर जखमी आहेत. 

सरकार म्हणाले, दहशतवादी संघटनांनी घडवला स्फोट 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार आत्मघातकी कारचा स्फोट शनिवारी झाला. द सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्स ने सांगितले की, मृतांमध्ये बहुतांश अशा नागरिकांचा समावेश आहे, ज्यांना सुरक्षित स्थळी हलवले जात होते. यात अनेक बंडखोरांचाही समावेश आहे. सिरियन अपोझिशन रेस्क्यू सर्व्हीसच्या मते हल्ल्यात 100 जण मारले गेले आहेत. 
- ऑब्झर्व्हेटरीच्या मते सरकार आणि बंडखोर यांच्यातील करारानुसार वेस्ट अलेप्पोच्या राशिदिनमध्ये असलेल्या फुआ आणि कफराया गावातून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात होते. पण त्याचवेळी हल्ला करण्यात आला. 
- मिळालेल्या माहितीनुसार आत्मघातकी हल्लेखोर, एक कार चालवत होता. त्यात मदतीसाठी साहित्य होते, त्याने बसजवळ जात स्फोट घडवला. सरकारा टिव्हीने दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटनांनी स्फोट घडवला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...