आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Suspect Arrested By Police In Connection With US Church Firing Case

US चर्चमध्ये फायरिंगः हल्लेखोर तरुणाला वडीलांनीच बर्थडे गिफ्ट दिली होती गन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार्ल्सटन (अमेरिका)- दक्षिण कॅरोलिना राज्यातील चार्ल्सटन येथील इमॅन्युअल आफ्रिकन मेथडिस्ट अॅपिस्कोपल चर्चमध्ये काल (गुरुवार) गोळीबार करुन 9 जणांना ठार मारणाऱ्या संशयीत तरुणाला अटक करण्यात आली आहे. लेक्झिंग्टन येथील 21 वर्षीय रहिवासी डिलेन रुफ असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याला उत्तर कॅरोलिनामधून अटक करण्यात आली आहे. त्याच्याबाबत बरीच रंजक माहिती समोर येत आहे. ज्या बंदुकीने त्याने कृष्णवर्णिय नागरिकांवर हल्ला केला ती त्याच्या वडीलांनी त्याला वाढदिवसाला भेट म्हणून दिली होती.
डिलेनचे काका काऊल्स यांनी सांगितले, की याच वर्षी त्याने 21 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्या वडीलांनी त्याला ही गन गिफ्ट दिली. तो फार शांत आणि संयमी मुलगा आहे. त्याच्या वडीलांनी त्याला .45 कॅलिबर पिस्तुल गिफ्ट दिले होते. पोलिसांनी डिलेनची माहिती जाहीर केल्यावर काऊल्स यांनी ही माहिती दिली.
यापूर्वी दोन वेळा झाली आहे अटक
शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या गुन्ह्यांसंदर्भात डिलेनला दोन वेळा अटक करण्यात आली होती, अशी माहिती येथील स्थानिक न्यायालयाने दिली आहे. कोलंबिया सेंटर शॉपिंग मॉलमध्ये तो एकदा संपूर्ण काळ्या कपड्यांमध्ये गेला होता. त्याने तेथील एका कर्मचाऱ्याला विचारले, की येथे किती जण काम करतात? त्यांची घरी जाण्याची वेळ काय आहे? त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा डिलेन म्हणाला, की मला या मॉलमध्ये जॉब करायचा होता. त्यामुळे मी ही विचारपुस केली होती. विशेष म्हणजे यावेळी त्याने जॉब अॅप्लिकेशनबाबत जराही विचारणा केली नव्हती. दुसऱ्या एका प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. एका छोट्या मॉलमध्ये तो ड्रग्ज घेऊन सापडला होता. त्यानंतर वर्षभरासाठी मॉलमध्ये न जाण्याची शिक्षा त्याला सुनावण्यात आली होती.
जगातील कोणत्याही विकसित देण्यात अशी घटना होत नाही- ओबामा
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कृष्णवर्णियांच्या चर्चवर झालेल्या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध केला आहे. ओबामा म्हणाले, की श्वेत व्यक्तीने गोळीबार करुन चर्चमध्ये कृष्णवर्णियांना ठार मारणे एक माथेफिरु घटना आहे. अशी घटना जगातील कोणत्याही विकसित देशात दिसत नाही.
गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेत कृष्णवर्णियांना टार्गेट केले जात आहे. श्वेत पोलिसांनी कृष्णवर्णिय तरुणांवर गोळीबार केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, घटनेशी संबंधित फोटो....