आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:च्याच पक्षाविरुद्ध ट्रम्प यांचे युद्ध, अश्लील CD उघड होताच रिपब्लिकन पक्ष उमेदवार आक्रमक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या इव्हेंजिलिकल अॅडव्हायजरी कौन्सिल सदस्यांनी खूप काळाआधी देशाप्रति ट्रम्प यांच्या दृष्टिकोनासाठी प्रार्थना करण्याचे लिखित वचन दिले होते. मात्र ट्रम्प यांच्याशी संबंधित उघड झालेल्या एका ध्वनिचित्रफितीने एकच खळबळ उडाली. या ध्वनिचित्रफितीत ट्रम्प महिलांसंबंधी अश्लिल विधाने करत असल्याचे स्पष्ट होते. तरीही कौन्सिलच्या सदस्यांनी ट्रम्प यांची बाजू लढवायचा निर्णय घेतला आहे. २३ पुरुष आणि ३ महिला पदाधिकाऱ्यांचा समूह ९ ऑक्टोंबरला दुपारनंतर एका सभागृहात जमा झाला.
धर्मगुरुंच्या समुहाने वेगळ्या प्रकारची व्याख्या सादर केली. त्यांना ट्रम्प यांच्याऐवजी डेमोक्रेट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यात खोट दिसत होती. डलास मेगाचर्चचे धर्मगुरू रॉबर्ट जेफ्रेस म्हणाले, कुणी छातीठोकपणे सांगू शकते काय, हिलरी नैतिक रुपाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याहून श्रेष्ठ आहेत? ही निवडणूक ट्रम्प यांच्या नव्हे तर अमेरिकेच्या भविष्यासाठी आहे. या निष्कर्षामुळे चर्चच्या अनेक प्रमुखांना लाजीरवाणे वाटत आहे. इव्हेंजिलकल समर्थक मासिक क्रिश्चिएनिटी टुडेचे संपादक लिहितात, आपल्या आत्म्याच्या किमतीवर काही मिळवण्याचा चर्चला लाभ होईल का? आणि ट्रम्प तर पश्चाताप न करणारी व्यक्ती आहे...
राष्ट्रपती निवडणुकीच्या धुमशानात ट्रम्प यांनी क्रिश्चियन अनुदारवाद्यांसह साऱ्या देशालाच ओढले आहे. अमेरिकेचे राजकारण त्यामुळे प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहे. रिपब्लिकन पक्षाचाच एक मोठा गट त्यांच्याविरोधात आहे. अंतिम क्षणी काही आश्चर्यकारक घटना न घडल्यास ट्रम्प यांच्या पराभवाची दाट शक्यता आहे. आता प्रश्न आहे की, त्यांच्यामुळे संसदेत (काँग्रेस) पक्षाचे बहुत समाप्त होईल काय?
हिलरी यांच्या दुसऱ्या वादफेरीच्या दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांची डिजिटल जाहिरात प्रसिद्ध झाली. आपला हा सामना साऱ्या जगाविरुद्ध आहे. मात्र हे अजूनही अस्पष्टच आहे की, त्यांची खरी शत्रू हिलरी क्लिंटन आहेत की, रिपब्लिकन पक्षाचे नेते. ट्रम्प यांनी ट्वीट केले की, “गद्दार रिपब्लिकन नेते कुटील हिलरी यांच्याहून जास्त वाकडे आहेत. ते सर्वच बाजूने हल्लाबोल करत आहेत. जिंकायचे कसे हे त्यांना माहित नाही. ते मी त्यांना शिकवेन.” त्यानंतर ट्रम्प समर्थकांनी अफवा पसरवली की, वादग्रस्त ध्वनिचित्रफित लीक करण्यात रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांचाच हात आहे. पक्षाच्या राजधानीस्थित मुख्यालयाात प्रशंसकांनी प्रदर्शन केले.
रिपब्लिकन पक्ष दोन भागात विभागला आहे. यातील उग्र दक्षिणपंथीय गट उदारमतवाद्यांना वेगळे पाडण्याचे स्वप्न नेहमीच पाहत आला आहे. वर्तमान घटनाक्रम पाहिल्यास पक्षात फूट पडल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाचे सल्लागार केविन शेरिडान यांचे म्हणणे आहे की, निवडणुकीदिवशी पक्षात खऱ्या गृहयुद्धाला सुरुवात होऊ शकते. ट्रम्प यांचा सुरुवातीपासूनच विरोध करणाऱ्या पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाच्या अशा अवस्थेची कल्पना आम्ही प्रारंभापासूनच देत आहोत.
समर्थकांचा आक्रमक पवित्रा
हिलरी यांच्याशी कडव्या चर्चेनंतर ट्रम्प आपल्या लोकप्रिय रॅलीसाठी विल्केस बारे, पासाडेनाला पोहोचले. अशा प्रसंगी ट्रम्प यांचे सारे अपराध माफ केले जातात वा त्यांच्याप्रती आनंद व्यक्त केला जातो. त्यांच्या भडक भाषणांना धैर्य मानले जाते. राष्ट्रपतीपद निवडणुकीत पहिलीच महिला उमेदवार असूनही अनेक लोकांनी महिलांच्या शरीरासंबंधी अश्लिल शब्दांचे टी शर्ट परिधान केले होते. समर्थकांची भाषा अतिशय आक्रमक होती. न्यूयॉर्कहून आलेला नील मेकनामारा म्हणाला की, त्या खुनी आहेत. खोटारड्या आहेत. ट्रम्प अशा लोकांचा उत्साह वाढवण्यात आनंद मानतात. ट्रम्प व्यासपीठाहून ओरडतात, त्यांना तुरुंगात पाठवणे योग्य ठरेल काय? गर्दी त्यांचे उत्सफुर्त समर्थन करते. टॅब्युलाइड वर्तमानपत्रांचे मथळे भरून जातात. ते स्वत: अशी माहिती लीक करतात. अध्यक्षीय वादफेरीतही त्यांना आपला पुरुषार्थ अभिमानाने सांगितला. त्यामुळे ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांना रिपब्लिक नेत्याांचा विरोध रुचला नाही. महिलांप्रती अश्लील संभाषण असणारी ध्वनिचित्रफीत उघड होताच ट्रम्प यांनी जाहीर माफी मागितली नाही. ते फक्त इतकेच म्हणाले, कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो.
रिपब्लिकन पक्षाचे बहुतांश खासदार अशा जिल्ह्यांतून निवडले गेले आहेत जेथे मुसलमान, मेक्सिकन, आफ्रिकी वा इतर कोणत्या जातीसमूहाच्या समर्थनाशिवाय विजय शक्य आहे. ट्रम्प या गटांना देशाची मुख्य समस्या मानतात. मात्र महिलांच्या समर्थनाशिवाय रिपब्लिकन पक्ष टिकूच शकत नाही. हा गट त्यांचा विश्वसनीय समर्थक मानला जातो. पक्षाचे नेतेही मान्य करतात की, ट्रम्प यांनी सीमा कधीच ओलांडली आहे. १० ऑक्टोबरला प्रमुख रिपल्बिकन नेते आणि संसदेचे सभापती पॉल रायन रिपब्लिकन खासदारांना म्हणाले, तुम्ही पक्षाच्या उमेदवारापासून स्वत:ला वेगळे करू शकता. ते म्हणाले, जे उचित वाटेल ते तुम्ही करू शकता.
डेमोक्रेट उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर अनेक अमेरिकनांचा विश्वास नाही. खाजगी इ-मेल त्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. तिकडे ध्वनिचित्रफित उघड होताच आपल्या ६६ मजली इमारतीत ट्रम्प यांनी एकट्याने आठवडा काढला. ते आपल्या निकटवर्तीयांच्या संपर्कात होते. ट्रम्प यांच्या निवडणूक अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनन यांचा यात समावेेश आहे. ते आपले वृत्तसंकेतस्थळ ब्रीटबार्टवर ट्रम्पविरोधी रिपब्लिकन नेत्यांवर टीकेची झोड उठवतात. या संकेतस्थळाने पॉल रायन यांच्याविरोधात खूप वर्षांपासून मोहिम उघडलेली आहे.
उगवते तारे सापडले संकटात
रिपब्लिकन पक्षात गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे. अनेक जण मानतात की, ट्रम्प यांनी अनुदारवादी आंदोलनाचे प्रचंड नुकसान केले आहे. पॉल रायन, मार्को रूबियोसारख्या उगवत्या नेत्यांचेे भविष्यच ट्रम्प यांच्या उमेदवारीमुळे संकटात सापडले आहे.
धार्मिक अनुदारवाद्यांना सांगावे लागेल की, त्यांनी तीनदा विवाह करणाऱ्या एका प्लेबॉयचे समर्थन का केले? नॅशनल हिस्पेनिक ख्रिश्चियन लीडरशिप कॉन्फरन्सचे अध्यक्ष सॅम्युअल्स रॉड्रिग्ज म्हणाले की, ट्रम्प यांनी इव्हेंजिलकलच्या राजकीय अजेंंड्याला धक्का पोहोचवला. दक्षिण बॅपटिस्ट कन्व्हेन्शनचे अध्यक्ष रसेल मूर म्हणाले की, ट्रम्प यांचे समर्थन करून चर्चच्या नेत्यांनी आपली विश्वासार्हता धुळीस मिळवली आहे.
- डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती बनू नये.
-कोंडोलिझा राइस, माजी परराष्ट्रमंत्री
- चांगले झाले की मी बेड्यांच्या जंजाळातून बाहेर आलो.-डोनाल्ड ट्रम्प
रिपब्लिकन उमेदवार
- रिपब्लिकन हरणासमान आहेत. आवाजाला घाबरतात.
-न्यूट गिंगरिच, माजी सभापती
- रिपब्लिकन पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे. जनताही संभ्रमात असेल असे वाटत नाही.
-बेन कारसन, रिपब्लिकन नेते
बातम्या आणखी आहेत...