आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन वाचवण्यासाठी गावाने सुरू केले स्वत:चे चलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वित्झर्लंडमध्ये जवळपास पूर्णच चलन बंद झाले आहे. चलनात असलेल्या नाण्यांमध्येही लहान नाणी कमी आहेत. यामुळे अनेकदा स्थानिक पर्यटनाला नुकसान होते. येथील लेस डायबलरेट्स हे गाव केबल कारसाठी प्रसिद्ध आहे. या कारचे केबिन गंडोला स्टाइलचे असतात. नागरिकांना त्यात प्रवास करण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. चलनी नाण्यांचा तुटवडा असल्याने या गावाची अर्थव्यवस्था डबघाईस आली होती. त्यामुळे गावातील परिषदेने आपले वेगळे चलन काढून नवी नाणी तयार केली आहेत. यावर गंडोला स्टाइलच्या केबल कार केबिनचे चित्र दर्शवण्यात आले आहे.

गाव परिषदेने तात्पुरती ५० हजार नाणी तयार केली असून ती संपूर्ण स्की रिसॉर्टमध्ये वितरित केली आहेत. या चलनाला सेनऊ असे नाव ठेवले असून याच्या विनिमयाद्वारे पर्यटक स्की रिसॉर्ट व गावापर्यंत पोहोचू शकतील. गावात पोहोचण्यासाठीदेखील लिफ्टने जावे लागते. ही नवी नाणी एप्रिल महिन्यापर्यंतच चलनात असतील. त्यांचा वापर स्थानिक दुकान, केबल कार चालक आणि गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी स्थानिकांना तसेच पर्यटकांना करता येईल. गावासाठी ही नाणी तयार करण्याची जबाबदारी एका स्थानिक समूहाने पार पाडली. अशी नाणी तयार केली नसती तर गावाची स्की रिसॉर्टची ओळख लोप पावली असती,असे गाव परिषदेच्या सदस्यांचे मत आहे. गावात अनेक हॉटेल आणि स्की स्कूल असून सर्व ठिकाणी लहान सहान व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंट करणे शक्य नाही.
 
- २०१५ मध्ये रशियातील एक नागरिक कोलिओन हे स्थानिक चलन तयार करण्यासाठी न्यायालयात गेला होता. त्याच्या मते, शेतकरी या चलनाचा उपयोग करतील. वस्तूंच्या किंमती अनेक काळापासून स्थिर आहेत. यामुळे महागाई वाढण्याचा धोकाही नाही. उदाहरणार्थ पाच कोलिओनमध्ये बटाट्यांची एक पूर्ण बास्केटच येते. 
बातम्या आणखी आहेत...