आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Youth Killed Girlfriend In Supermarket In Wee Hours

Chilling Video: सुपरमार्केटमध्ये तरुणाने गर्लफ्रेंडला 13 वेळा भोसकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो (श्रीलंका)- प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने सुपरमार्केटमध्ये जाऊन गर्लफ्रेडला तब्बल 13 वेळा भोसकून ठार मारल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
कोलंबोच्या वट्टाला भागातील एका सुपरमार्केटमध्ये ही घटना घडली. कपडे खरेदी करण्यासाठी 19 वर्षीय फातिमा रोशनी येथे आली होती. त्यावेळी तिचा प्रियकर तेथे दाखल झाला. त्याच्या हातात धारदार सुरी होती. त्याने फातिमाला भोसकण्यास सुरवात केली. यावेळी इतर ग्राहकांना धक्काच बसला. एका व्यक्तीने यावेळी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही या तरुणाने चाकू दाखवला.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहे. सुरवातीला हा तरुण सर्वसामान्य ग्राहकाप्रमाणे सुपरमार्केटमध्ये शिरताना दिसतो. त्यानंतर तो फातिमाजवळ जातो. तिला काही समजण्यापूर्वी चाकू काढून भोसकू लागतो. जरा वेळात ती जमिनीवर कोसळते.
यावेळी सुपरमार्केटमधील काही कर्मचारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात. फातिमाला भोसकल्यानंतर या तरुणाने स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण कर्मचाऱ्यांनी त्याला लगेच रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.