आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीबियाहून इटलीला जाणार्‍या जहाजाला जलसमाधी; 400 प्रवाशांचा मृत्यू?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम- लीबियाहून इटलीला जाणार्‍या एका जहाजाला मंगळवारी (14 एप्रिल) भूमध्यसागरात जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत 400 लोकांचा मृत्यु झाल्याची भीती व्यक्त करण्‍यात आली आहे. दुर्घटना झाली तेव्हा जहाजात 550 प्रवाशी होते. त्यापैकी 150 प्रवाशांनी वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. त्यात बहुतांश लोक आफ्रिकन आहेत. सगळ्यांना दक्षिण इटलीतील पोर्टवर सुरक्षित पोहोचवण्यात आले आहे.

जिनेव्हा इंटरनॅशनल ऑर्गेनायझेशन फॉर मायग्रेशनने (IOM) दिलेली माहिती अशी की, या वर्षी भूमध्यसागरात या सारखे अनेक दुर्घटना घडल्या असून त्यात आतापर्यंत 500 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

भूमध्यसागरात अपघात झालेला पॅसेज हा वसंत ऋतुत प्रवाशांसाठी सुरक्षित समजला जातो. परंतु, गेल्या फेब्रुवारीत बर्फ गोठल्याने या पॅसेजमध्ये अनेक अपघात झाले. त्यात 300 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 'सेव्ह द चिल्ड्रन आणि IOM सारख्या संस्थेने युरोपीय संघाकडून मदतीची मागणी केली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, रेस्क्यू ऑपरेशनचे फोटो....