आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: धरतीवरच नरक यातना सहन करताहेत रोहिंग्या मुस्लिम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - मान्यनारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून रोहिंग्याविरोधी हिंसाचार भडकला आहे. या हिंसाचाराच्या आगीत दररोज शेकडो रोहिंग्या मुस्लिम होरपळत आहेत. जीव वाचवण्यासाठी लाखो रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात शरण घेतली. मात्र, चिखल आणि दलदलीने भरलेली नदी ओलांडून जातानाही अनेकांच्या मृत्यूचे वृत्त दररोज समोर येत आहेत. एका अहवालानुसार, बांगलादेशच्या सीमेवर आतापर्यंत 6 लाख रोहिंग्या मुस्लिम पोहोचले आहेत. यात अगदी नवजात बाळांसह 80 वर्षांच्या वृद्धांचा देखील समावेश आहे. त्यातही शरणार्थींपैकी 58 टक्के लहान मुले-मुली आहेत. अतिशय घाणेरड्या वातावरणात जीव मुठीत धरून जगणाऱ्या या मुलांमध्ये रोगराई आणि कुपोषण पसरले आहे. 
 
 
17 व्या शतकात म्यानमारला येऊन वसलेले रोहिंग्यांना अद्याप नागरिकत्व देण्यात आलेले नाही. 18 व्या शतकात रोहिंग्या बहुल रॅखीन प्रांतावर बौद्धांनी नियंत्रण मिळवले. तेव्हापासून रोहिंग्यांना हटवण्याचे काम थांबून-थांबून सुरूच आहेत. विशेष म्हणजे, शांततेचे नोबेल मिळवणाऱ्या म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांनीही रोहिंग्यांवरील कारवाई योग्य ठरवली आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बांगलादेश गाठण्यासाठी रोहिंग्यांच्या संघर्षाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...