आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्राध्‍यापकाने फोडला ISIS ला घाम, केला दीड हजार दहशतवाद्यांचा खात्‍मा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबू अजरैल अल रुबई - Divya Marathi
अबू अजरैल अल रुबई
'इसिस' अर्थात 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक व अल शाम' (आयएसआयएस) ही जगातील सर्वात क्रुर दहशतवादी संघटना. तिचा खात्‍मा कसा करावा, हाच प्रश्‍न आज संपूर्ण जगासमोर आहे. तिच्‍या क्रुर कारनाम्‍यामुळे संपूर्ण जग हादरून गेले. पण, एक व्‍यक्‍ती अशीही आहे की, जिचे केवळ नाव उच्‍चारले तर इसिसचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याची बोबडी वळते. दहशतवाद्यांना घाम फुटतो. अबू अजरैल अल रुबई असे त्‍याचे नाव असून, तो प्राध्‍यापक होता. पण, आता रिअल लाइफ रेम्बो म्‍हणून या यौद्ध्याची लोकप्रियता वाढत आहे. त्‍याच्‍याविषयी divyamarathi.com चा खास वृत्‍तांत...
कोण आहेत अबू अजरैल अल रुबई ?
- 40 वर्षीय अबू अजरैल हे मूळ इराणी आहेत.
- आता ते इराकमध्‍ये राहतात.
- ते इराणमधील एका विद्यापीठात प्राध्‍यापक होते.
- इसिसकडून निष्‍पाप शिया मुसलमांची केली जाणारी कत्लेआम पाहून अबू अजरैल यांचे संवेदशील मन अधिकच संवेदनशील झाले.
- त्‍यामुळेच दोन वर्षांपूर्वी त्‍यांनी आपल्‍या गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून इसिसविरुद्धच्‍या इमाम अली ब्रिगेडमध्‍ये भाग घेतला.
- त्‍यातूनच ते इराण सोडून इराकमध्‍ये आले.
- सुरुवातीला या मानवतावादी संघटनेत साधे सदस्‍य असलेले तायक्वांदो चॅम्पियन अबू अजरैल केवळ या संघटनेचे प्रमुख बनले असे नाही तर इसिस विरुद्ध लढणारा सर्वात शुरवीर यौद्धा म्‍हणूनही आता त्‍यांची गणना व्‍हायला लागली.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, एकट्याने केला इसिसच्‍या 1 हजार 500 दहशतवाद्यांचा खात्‍मा...