रोस्जके (हंगेरी) - सायबेरियाच्या सीमाभागातून हंगेरीत घुसण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका निर्वासीताच्या पायात पाय अडकवून त्याला पाडणाऱ्या कॅमरे पर्सनाला (महिला पत्रकार) नोकरीवरुन तडकाफडकी काढण्यात आले आहे. तिला आता कायदेशीर चौकशीलाही समारे जावे लागण्याची शक्यता आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हंगेरीचे न्यूज चॅनल N1TV ने महिला पत्रकार पेट्रा लास्जलोला निलंबीत केले आहे.
काय आहे प्रकरण
सायबेरिया सीमेकडून हंगेरीत प्रवेश करणाऱ्या निर्वासितांचे वार्तांकन करण्यासाठी पेट्रा लास्जलो गेली होती. सिरियाचे हजारो निर्वासित जीव वाचवण्यासाठी हंगेरीत दाखल होत होते. तेव्हाच शेकडो पोलिस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. पेट्रा त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होती. याच दरम्यान मुलाला घेऊन पळत असलेल्या एका निर्वासिताच्या पायात पाय अडकून पेट्राने त्याला पाडले. तो निर्वासित मुलासह कोसळला. त्याच्या हातातून मुलगा पडला.
सर्वांनी केली निंदा
N1TV चॅनल हे अँटी इमीग्रेशन फॉर राइट जॉबिक पार्टीद्वारे चालवले जाते. त्यांनी इंटरनेटवर जेव्हा पेट्राचा व्हिडिओ पाहिले तेव्हा तिचे कृत्य सहन करण्यायोग्य नसल्याचे म्हटले. तिला तत्काळ नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. विरोधी पक्ष इज्यूट आणि पंतप्रधानांनी पेट्रावर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तिच्यावर गंभीर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. कमीत कमी पाच वर्षांपर्यंत कैदेची तिला शक्यता आहे. ट्विटर आणि फेसबुकवरुनही पेट्रावर टीका होत आहे.
एका फोटोने फोडली निर्वासितांच्या प्रश्नांना वाचा
तुर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर बेवारस पडलल्या तीन वर्षांच्या आयलान कुर्दीच्या कलेवराचे फोटो क्लिक करुन त्याची निर्वासित होण्याची वेदना फोटोच्या माध्यमातून जगाला सांगणारी निलुफर देमिर कुठे आणि त्याच्या काही दिवसांनीच लहान मुलाला घेऊन जीवाच्या आकांताने धावणाऱ्या निर्वासिताला तोंडावर पाडणारी पेट्रा कुठे, अशी चर्चाही सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी फोटोज्