आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US मध्ये मुस्लीम समजून भारतीयांचे स्टोर जाळण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या नक्षलवादी हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी भारतीय समाजाला लक्ष्य करण्यात आले आहे. फ्लोरिडामध्ये एका व्यक्तीने भारतीय अमेरिकन्सना मुस्लीम समजून त्यांचे स्टोर जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपीचे नाव रिचर्ड लॉयड असल्याचे सांगितले जात आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतून अरबी लोकांना पळवून लावायचे असल्याचे तो म्हणाला. 

फर्स्ट डीग्री जाळपोळ केल्याचा चार्ज 
- न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी म्हणजे 10 मार्च रोजी सकाळी घडलेली आहे. सेंट ल्युसिया कौंटी मधील शेरिफ मस्कारा यांनी सांगितले की, एका 64 वर्षीय व्यक्तीने स्टोरला आग लावण्याचा प्रयत्न केला. त्याचे कारण म्हणजे स्टोरचा मालक मुस्लीम असल्याचे त्याला वाटले होते. 
- आरोपीचे नाव रिचर्ड लॉयड असल्याचे सांगितले आहे. अरबी लोकांना अमेरिकेतून पळवून लावायचे असल्याचे तो म्हणाला होता. त्यासाठी त्याने एक डम्प्सटर (कचराकुंडी) पोर्ट सेंट लुईस स्टोर समोर ढकलल्यानंतर त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला. आरोपी रिचर्डवर फर्स्ट डीग्रीचा चार्ज लावला आहे. 

भारतीयांवर नुकतेच झालेले हल्ले 
- वॉशिंग्टनमध्ये 3 मार्चला एका शीखाला गोळी मारण्यात आली होती. 39 वर्षांचे भारतीय शीख दीप राय यांना त्यांच्या घराच्या बाहेर गोळी मारण्यात आली. अत्यंत गंभीर जखमी झाल्यानंतरही ते वाचले. हल्लेखोराने गोळी मारल्यानंतर त्यांना तुमच्या देशात निघून जा असे म्हटले. 
- 2 मार्चला साऊथ कॅरोलिनाच्या लंकास्टरमध्ये 43 वर्षीय हरनीश पटेलला गोळी मारली होती. त्यांची बॉडी त्यांच्या घराजवळ आढळली होती. 
- 22 फेब्रुवारीला कंसासच्या एका बारमध्ये एका 32 वर्षीय भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोतला याची फायरिंगमध्ये हत्या झाली होती. 
- अमेरिकेत रेल्वेत जाणारी एक बारतीय तरुणी एकता देसाईला एक आफ्रिकन अमेरिकन म्हणाला होता माझ्या देशातून निघून जा. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...