आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बियॉन्सला हरवून अॅडेलेने जिंकला ग्रॅमी; म्हणाली, ‘बियॉन्स सर्वश्रेष्ठ कलावंत’, तोडली ट्रॉफी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - रविवारी स्टेपल्स सेंटरमध्ये ५९ व्या ग्रॅमी पुरस्कार समारंभात ब्रिटिश गायिका अॅडेले हिने ‘२५’ हा अल्बम आणि ‘हॅलो’ या गीतासाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकला. अॅडेलेने गायिका बियॉन्सला हरवून हा पुरस्कार जिंकला. ट्रॉफी घेण्यास आलेल्या अॅडेलेने ग्रॅमी पुरस्कार तोडून बियॉन्ससह विभागून घेण्याची घोषणा केली.
 
भावुक अॅडेलेने बियॉन्सकडे पाहिले आणि म्हणाली- आभार, पण मी हा पुरस्कार स्वीकारू शकत नाही. कारण माझ्यासाठी सर्वात मोठी कलावंत बियॉन्स आहे.’अॅडेलेच्या मनोगताने बियॉन्सही भावुक झाली. प्रेक्षागृहात बसलेल्या बियॉन्सला अश्रू अनावर झाले.  
 
५९ वे ग्रॅमी पुरस्कार  
} अल्बम ऑफ द इयर - २५, अॅडेले  
} साँग ऑफ द इयर - हॅलो, अॅडेले  
} बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स - हॅलो, अॅडेले  
} बेस्ट पॉप व्होकल अल्बम - २५, अॅडेले  
} बेस्ट अर्बन कंटेम्पररी अल्बम -    लेमंड  
 
अभिनेता देव पटेलला पहिला बाफ्ता पुरस्कार  
रविवारी लंडनमध्ये आयोजित ७० व्या ब्रिटिश अकॅडमी चित्रपट पुरस्कार समारंभात भारतवंशीय ब्रिटिश अभिनेता देव पटेल याला ‘लायन’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. समारंभात दिग्दर्शक डॅमियन चेजेल दिग्दर्शित संगीतमय चित्रपट ‘ला ला लँड’ने उत्कृष्ट चित्रपट आणि उत्कृष्ट अभिनेत्री (अॅमा स्टॉन) सह पाच श्रेणींत पुरस्कार पटकावला.  
 
उत्कृष्ट चित्रपट : ला ला लँड  
उत्कृष्ट दिग्दर्शक : डॅमियन चेजेल (ला ला लँड)  
उत्कृष्ट अभिनेता : केसी अॅफलेक (मँचेस्टर बाय द सी)  
उत्कृष्ट अभिनेत्री : अॅमा स्टॉन (ला ला लँड)  
उत्कृष्ट सहा. अभिनेत्री : वायोला डेव्हिस (फेन्सिस)  
बातम्या आणखी आहेत...