आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्ल्यू व्हेल गेमच्या अॅडमिन मुलीस रशियामध्ये अटक, युवती मानसोपचार शास्त्राची विद्यार्थिनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माॅस्को- ब्ल्यू व्हेल या जगात खळबळ उडवून दिलेल्या ऑनलाइन गेमची अॅडमिन असलेल्या १७ वर्षीय मुलीस रशियात अटक करण्यात आली आहे. गेम खेळणाऱ्या मुलांना हीच धमक्या देत होती. ब्ल्यू व्हेलचे टास्क पूर्ण केले नाही तर त्याला आणि कुटुंबीयांना ठार केले जाईल, अशी धमकी या गेमच्या माध्यमातून देण्याचे तंत्र याच मुलीकडे होते. ही मुलगी मानसोपचारशास्त्राची विद्यार्थिनी आहे. तिने गुन्हाही कबूल केला आहे. 
 
न्यायालयात हजर केल्यानंतर ितला तुरुंगात पाठवण्यात आले. फिलीप बुडेकिन याने २०१३मध्ये हा गेम तयार केला होता.  या गेममुळे रशियात आत्महत्या वाढल्यानंतर त्याला अटक झाली. तो सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, पद्दुचेरीतील केंद्रीय विद्यापीठाचा एमबीएतील विद्यार्थी शशिकुमार बोरा (२३) याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
बातम्या आणखी आहेत...