आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिटलरच्या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचा हातोहात खप, इतिहासकारांना चिंता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लीन - नाझी भस्मासुर म्हणून जगाला माहीत असलेल्या अडॉल्फ हिटलरच्या ‘माइन काम्फ’ या आत्मचरित्राची नवी आवृत्ती नुकतीच विक्रीस आली होती. जर्मनीत गेल्या आठवड्यातच हे पुस्तक सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले होते. त्याचा हातोहात खप झाला. ऑनलाइन या पुस्तकाची किंमत १० हजार युरो ठेवली आहे. हिटलरचे वर्णद्वेषी लिखाण गेल्या शुक्रवारीच विक्रीला ठेवण्यात आले होते.

माइन काम्फच्या या नव्या आवृत्तीत हिटलरच्या लिखाणाची समीक्षाही केली आहे. या नव्या आवृत्तीमुळे ज्यू समुदायात असंतोष पसरेल तसेच हिटलरसारख्या अतिरेकी भूमिका घेणाऱ्या हुकूमशहाला साहित्य वर्तुळात नाहक स्थान मिळेल, अशी भीती ब्रिटिश इतिहासकारांनी व्यक्त केली. या पुस्तकाचे दर्शनी मूल्य ५९ युरो अाहे. शिवाय १५ हजार वाचकांनी आपली मागणी प्रकाशनापूर्वीच नोंदवली आहे. सध्या पुस्तकाच्या ४००० प्रती विक्रीस आल्या आहेत.

प्रमुख विक्रेत्यांकडे मागणी
ड्युस्समन नामक बर्लिनमधील सर्वात मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे पहिल्या दिवशी दुपारपर्यंतच सर्व प्रती खपल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडे २० प्रती आल्या होत्या. मागणी मात्र ५० ग्राहकांनी केली. इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी हिस्ट्री या म्युनिच येथिल प्रकाशन संस्थेने पुस्तक प्रकाशित केले. त्यांनी अॅमेझॉनवर याची किंमत ९,९९९ युरो दिली आहे.

१९२५ मध्ये पहिली आवृत्ती
हिटलरने १९२३ मध्ये हे पुस्तक लिहिले व ते १९२५ मध्ये प्रकाशित झाले. माइन काम्फ अर्थात ‘माझा संघर्ष’. हिब्रु , अरेबिक, कम्युनिस्ट विचारधारेविरुद्धची मते याद्वारे मांडली आहेत. परदेशस्थ नागरिकांविषयीचे भय यातून हिटलरने व्यक्त केले होते. नव्या आवृत्तीत ३,५०० नवी टिपणे आहेत. ‘हिटलर, माइन काम्फ : अ क्रिटिकल एडिशन’ या नावाने नवी आवृत्ती विक्रीस आली आहे. हिटलरचे हे पुस्तक १,९४८ पानांचे आहे.
बातम्या आणखी आहेत...