आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काबूलमध्‍ये तालिबान्यांचा हल्ला, 4 दहशतवादी मारली गेली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्‍ये मंगळवारी रात्री गेस्ट हाऊसवर तालिबानने हल्ले केले. वजीर अकबर खान जिल्ह्यातील डिप्लोमॅटिक एरियात सहा तास चाललेल्या ऑपरेशनमध्‍ये चार शस्त्रधारी दहशतवादी मारली गेली आहे. भागात अनेक राजदूत कार्यालय आणि सरकारी निवास्थाने आहेत. हल्ल्यात कोणतेही जीवीत हानी झालेली नाही. अंतर्गत कारभाराचे उपमंत्री मोहंमद अयूब सालंगीने ट्विट करुन सांगितले, की हल्लेखोरांना एक आरपीजी लॉन्चर, तीन एके-47 आणि ग्रेनेड लॉन्चरने अकबर खान जिल्ह्यात मारण्‍यात आली.
सुरक्षा रक्षकांनी हल्ला उधळवले
काबूल पोलिस प्रवक्ता इबादुल्ला करिमीने सांगितले, की हितल गेस्ट हाऊसवर मंगळवारी रात्री 11 वाजता हल्ला झाला. अनेक तास स्फोटांचे आवाज येते होते. दहशतवाद्यांनी गेस्ट हाऊसच्या मागे तीन झाडांचा आडोसा घेतला होता. गेस्ट हाऊसमध्‍ये काही स्फोट झाले होते. परंतु सुरक्षा कर्मचा-यांनी गोळीबार सुरु केल्याने ती आत जाऊ शकले नाही. एका हल्लेखोराने रॉकेटने मुख्‍य दरवाजा उडवण्‍याचा प्रयत्न केला. परंतु त्यास यश मिळाले नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा लष्‍करी कारवाईचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...