आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Afghan Woman Accused Of Adultery Is Stoned To Death

अफगाणिस्तान : पळून गेलेल्‍या विवाहितेला ठेचून मारले, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबुल - विवाहानंतर आपल्‍या प्रियकरासोबत पळून गेलेल्‍या एका 20 वर्षीय तरुणीला नागरिकांनी दगड मारून मारून ठार केले. ही क्रुर घटना अफगाणिस्‍तानात घडली असून, याचा व्‍ह‍िडिओ व्‍हायलर झाला आहे. या तरुणीच्‍या इच्‍छेविरुद्ध तिच्‍या कुटुंबीयांनी दुसऱ्यासोबत लग्‍न लावून दिले होते. त्‍या नंतर ती आपल्‍या प्रियकरासोबत पळून गेली होती. रुखसाना असे तिचे नाव आहे.
नेमके काय आहे व्‍ह‍िडिओमध्‍ये
एका खड्यात या युवतीला गळ्यापर्यंत गाडलेले आहे. त्‍यानंतर लोकांनी तिला दगड मारायला सुरुवात केली. दगड मारताना लोक तिला रुकसाना असे म्‍हणत आहेत.
प्रशासनाचा दुजोरा
ही घटना फिरोजकोहची राजधानी घोरच्‍या परिासरात घडली आहे. या वर्षीतील अशा प्रकारची ही पहिला घटना आहे, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. संपूर्ण अफगाणीस्‍तानात अनिष्‍ठ रुढी आणि परंपरेमुळे महिलांचे जीवन अवघड झाले असून, घोर परिसरातील लोक अधिक रुढीवादी आहेत.
प्रियकरासोबत शरीर संबंध करताना पकडली गेली
ज्‍या तरुणीची हत्‍या झाली ती प्रियकरासोबत शरीर संबंध करताना पकडली गेली होती. त्‍यानंतर आपल्‍या 23 वर्षीय प्रियकरासोबत ती लग्‍नकरण्‍यासाठी पळून गेली होती. त्‍यानंतर तिला पकडून ठार करण्‍यात आले. ही घटना एका आठवड्यापूर्वीची आहे, असे वृत्‍त अफगाणिस्तानमधील टोलो न्यूज एजेंसीने दिले.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...