आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानमध्ये मिलिटरी हेलिकॉप्टर क्रॅश, 5 वैमानिकांसह 17 जणांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबुल- दक्षिण अफगाणिस्तानमध्ये मिलिटरी हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने पाच वैमानिकांसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. लष्कराचे 12 जवान या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. जाबूल प्रांताचे पोलिस प्रमुख मीरवैस नुरजई यांनी ही माहिती दिली आहे. अफगाण नॅशनल आर्मीचे हे हेलिकॉप्टर होते.
अफगाणिस्तानच्या लष्कराने अपघात झाल्याचे सांगितले आहे. परंतु, अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. यापूर्वी जाबूल प्रांताचे सरकारचे प्रवक्ते गुल इस्लाम सयाल यांनी सांगितले होते, की तांत्रिक बिघाड झाल्याने हे हेलिकॉप्टर कोसळले आहे.
अफगाणिस्तानच्या मिलिटरीत 150 लढाऊ विमाने आणि 390 वैमानिक आहेत. हवाई दलात एमआय-17 हेलिकॉप्टर मोठ्या प्रमाणावर आहेत. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर कोणत्या प्रकारातील होते हे मात्र समजू शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...