आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तान करिता दहशतवादापेक्षा अंमली पदार्थांचा जास्‍त धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अफगाणिस्तानमध्‍ये जारी जिल्ह्यात शेतात अफूचा नायनाट करण्‍यास पोहोचलेले पोलिस - Divya Marathi
अफगाणिस्तानमध्‍ये जारी जिल्ह्यात शेतात अफूचा नायनाट करण्‍यास पोहोचलेले पोलिस
काबूल - अफगाणिस्तानमध्‍ये अफूची चांगली शेती होते. मागील वर्षी शेतीने एक नवा विक्रम स्थापित केला होता. हिरॉइनसाठी आवश्‍यक घटक हे अफूपासून बनवले जाते. अफगाणिस्तान जगात हिरॉइन सर्वात जास्त म्हणजे 90 टक्के पुरवठा करणारा देश आहे.
अफू उत्पादनाबरोबरच अंमली पदार्थ वापरण्‍यात अफगाण‍िस्तान आघाडीवर आहे. देशात 30 लाख लोक ह‍िरॉइनचे शिकार आहेत. एका स्थानिक आरोग्य अधिका-यांने सांगितले, की हे देशात सुनामीप्रमाणे आहे. नाटो सेना अफगाणिस्तानमधून माघार घेत आहे. दुसरीकडे स्थानिक संस्था आणि प्रशासकीय तंत्र सध्‍या वाईट स्थितीत आहे.
हिरॉइन आणि अफूसारख्‍या अंमली पदार्थांमुळे तालिबान आणि अल काइदासारख्‍या दहशतवादी संघटनांना निधी मिळत आहे. अफूचे उत्पादन भविष्‍यात वाढण्‍याची शक्यता आहे. या अंमली पदार्थांचे साम्राज्य युध्‍दाने वेढालेल्या अफगाणिस्तानमध्‍ये आणखी संकट तर आणणार नाही ना?
पुढील स्लाइड्सवर पाहा, अफगाणिस्तानमध्‍ये अफूची शेती थांबवण्‍यासाठी पोलिस करत असलेल्या प्रयत्नाचे PHOTOS