आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Afghanistan First Female Air Force Pilot Get Women Of Courage Award

PHOTOS : अफगाण लष्‍करातील पहिली महिला वैमानिक, दहशतवाद्यांना देतेय टक्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: निलोफर रहमानी
काबूल - पाच वर्षांपूर्वी अफगाण‍िस्तानमध्‍ये महिलांना बुरखा घातल्याशिवाय बाहेर पडण्‍यास परवानगी नव्हती. परंतु 18 वर्षांची निलोफर रहमानी या तरुणीला वैमानिक व्हायचे होते.लहानपणापासून तिचे स्वप्न होते. प्रतिकुल परिस्थितीत तिने अफगाण एअरफोर्समध्‍ये नोकरी सुरु केली. दहशतवादी गटाबरोबरच नातेवाइकांनीही जीवे मारण्‍याची धमकी दिली होती. आता 23 वर्षांची निलोफर अफगाणिस्तानच्या इतिहासात पहिली महिला फ‍िक्स-विंग एअरफोर्स एव्हिएटर बनली आहे. तालिबानी शासन समाप्त झाल्यानंतर 2001 मध्‍ये अफगान लष्‍कराची पहिली महिला वैमानिक बनली.नुकतेच अमेरिकेच्या परराष्‍ट्र मंत्रालयाने तिला इंटरनॅशनल विमेन ऑफ करेज अॅवॉर्डने सन्मानित केले आहे.

इंग्रजी शिकले कारण फ्लाइंग स्कूल जायला मिळेल
कॅप्टन रहमानी म्हणते, फ्लाइंग स्कूलमध्‍ये जाण्‍यासाठी एक वर्ष इंग्रजी शिकले. 2010 मध्‍ये अफगाण एअरफोर्स ऑफ‍िसर ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी निवडली गेली. जुलै 2012 मध्‍ये सेकंड लेफ्टनंट बनली. पहिल्यांदाच सेसना-182 उडवले होते.तेव्हाच तिने मोठे विमान उडवण्‍याचा निर्णय घेतला. यामुळेच अॅडव्हान्स्ड फ्लाइंग स्कूलमध्‍ये प्रवेश घेतला.

आदेशांकडे दुर्लक्ष करुन जवानांचा जीव वाचवला
अफगाणिस्तानातील परंपरेनुसार महिलांना मृत किंवा जखमी सैनिकांना पोहोचवण्‍याची परवानगी नाही. परंतु एका मिशनच्या दरम्यान जेव्हा सैनिक जखमी दिसले तेव्हा रहमानीने जुनी परंपरा बाजूला ठेवून त्यांना हॉस्पिटलमध्‍ये दाखल केले.

फ्लाइट इन्स्‍ट्रक्टर होणार, कारण इतरांना प्रेरणा मिळेल
कॅप्टन रहमानी म्हणते,की तिला फ्लाइट इन्स्ट्रक्टर व्हायचे आहे.कारण इतर महिलांना प्रेरणा मिळेल. तालिबानच्या धमक्या येत असतानाही ती आपले अफगाण एअरफोर्समध्‍ये करिअर चालू ठेवणार आहे. तुम्ही स्वत:ला एक महिला म्हणून न घेता. तुम्ही एक माणूस आहात, असे ती इतर महिलांना सांगते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अफगाण लष्‍करातील पहिला महिला वैमानिकाचे फोटोज..