आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्रफ गनी यांची PAK ला वॉर्निंग- 'वाघा'कडून व्‍यापार रोखल्‍यास आम्‍हीही बंद करू तुमचे रस्‍ते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबुल- तुम्‍ही आमचा रस्‍ता रोखला तर, आम्‍हीही तुमचा रस्‍ता रोखू असा स्‍पष्‍ट इशारा अफगाणिस्तानने पाकिस्‍तानला दिला आहे. "पाकिस्तान जर आम्‍हाला वाघा सिमेवरून भारतासोबत व्‍यापार करण्‍यास प्रतिबंध घालत असेल तर, आम्‍हीही त्‍यांच्‍यासाठी मध्य आशियाई स्टेट्सकडे (CAS) जाणा-या मार्गांवर प्रतिबंध घालू." अशा शब्दात अफगाणिस्‍तानचे अध्‍यक्ष अश्रफ गनी यांनी पाकिस्‍तानला सुनावले आहे. अफगाणिस्‍तानचे अध्‍यक्ष अश्रफ गनी यांच्‍या या इशा-यावर पाकिस्तानच्‍या एका अधिका-याने म्‍हटले की, असे करणे शक्‍य नाही. येणा-या 14 सप्‍टेंबरला गनी हे दोन दिवस भारताच्‍या दौ-यावर आहेत.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, गनी यांनी शुक्रवारी, यूकेचे पाकिस्तान-अफगाणिस्तानचे विशेष प्रतिनिधी ओवन जेन्किंस यांच्‍याशी चर्चा केली.
- राष्ट्राध्‍यक्षांच्‍या कार्यालयाकडून जाहीर केलेल्‍या एका निवेदनात म्‍हटले आहे की, जर पाकिस्तान वाघा सिमेकडून भारतात व्‍यापारासाठी जाण्‍यास मनाई करत असेल तर, आम्‍हीही मध्‍य आशियाई देशांकडे जाणा-या मार्गांवर पाकिस्‍तानला बंदी घालू शकतो.

पाकिस्तानचे काय आहे म्‍हणणे?
- पाकच्‍या एका अधिका-याच्‍या मतानुसार, 'अफगाणच्‍या अध्‍यक्षांना भारतासोबत व्‍यावसायिक संबंध ठेवण्‍यासाठी सूट हवी आहे. मात्र, आताही अफगाणच्‍या ट्रकला भारतात सामान घेऊन जाण्‍यास सूट आहे.'
- 'शिवाय अफगाणिस्तानसोबत आमचा जो करार आहे. त्‍यानुसार, त्‍यांचे ट्रक भारतात जाऊ देण्‍यास मनाई आहे.
- सुरक्षेच्‍या कारणांचा विचार केल्‍यास अफगाणचे रस्‍ते आशियाई देशांसोबत व्‍यापार करण्‍यास उत्‍तम नाहीत.
- आम्‍ही ताजिकिस्तानसोबत ट्राइलेटरल ट्रांजिट ट्रेड एग्रीमेंट (TTTA) संदर्भात विचार करत आहोत.
- याशिवाय पाकिस्तान, चीनसोबत बनत असलेल्‍या चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोरला (CPEC) किर्गिस्तान आणि ताजिकिस्तानपर्यंत वाढवण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. त्‍यामुळे पाकिस्‍तानचा मध्‍य आशियाई देशांपर्यंत जाण्‍याचा रस्‍ता तयार होऊ शकतो.
गनी यांचा दोन दिवसांचा भारत दौरा
- 14 सप्‍टेंबरला अश्रफ गनी दोन दिवस भारताच्‍या दौ-यावर आहेत.
- गनी नरेंद्र मोदी यांच्‍यासोबत संरक्षण, व्यापार, सुरक्षा या विषयावर चर्चा करणार आहेत.
- अफगाणिस्तान भारताकडून शस्‍त्रांचा पुरवठा वाढवण्‍यासंदर्भात मागणी करत आहे.
- भारताने गेल्‍या वर्षी पहिल्‍यांदाच अफगाणिस्तानला 4 Mi-25 हेलिकॉप्टर दिले होते.
बातम्या आणखी आहेत...