आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Afghanistan Suicide Attack: At Least 24 Killed In Kabul Blast, Taliban Claims Responsibility

काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ शक्तिशाली स्‍फोट; ३० ठार, ३३० जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल- अफगाणिस्तानची राजधानी मंगळवारी आत्मघातकी बाँबस्फोटाने हादरली. त्यात ३० जण ठार, तर ३३० जण जखमी झाले. मृतांत बहुतेक नागरिकांचा समावेश आहे. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

तालिबानने राजधानीतील सरकारी कार्यालयांच्या इमारतीजवळ हे स्फोट घडवले. स्फोटानंतर घटनास्थळी आकाशात धुराचे लोट जमले होते. कित्येक किलोमीटरवरील इमारतींच्या खिडक्याच्या काचाही निखळून पडल्या. त्यावरून स्फोटाची तीव्रता स्पष्ट होते. पौली महमूद खान या शहरात हा दहशतवादी हल्ला झाला. जखमींना तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यामुळे अफगाणच्या दहशतवादविरोधी लढाईचा निर्धार तसूभरही कमी होणार नाही, अशा शब्दांत अफगाणचे राष्ट्राध्यक्ष घनी यांनी घटनेचा निषेध केला. पहिला हल्ला आत्मघातकी हल्ला होता. ट्रकच्या साह्याने हा स्फोट घडवण्यात आला. स्फोटकांनी भरलेला हा ट्रक होता. संघटनेचा म्होरक्या मुल्ला आेमरला गेल्या वर्षी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याचा सूड म्हणून अफगाणिस्तानात ठिकठिकाणी दहशतवादी हल्ले केले जातील, अशी धमकी तालिबानने दिली होती. गेल्या आठवड्यात उत्तरेकडील कुंडुझ शहरात बंडखोरांनी हिंसाचार घडवून आणला होता. तालिबानने अफगाण सरकारी फौजांना आपले शत्रू असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर अफगाणचे सैन्य हे आमच्यापुढे कमी क्षमतेचे आहे. त्यामुळेच आतापर्यंत ५ हजारांवर सैनिकांना ठार करण्यात आल्याचे तालिबानने म्हटले आहे. तालिबान आणि अफगाण यांच्यातील संघर्ष थांबावा यासाठी चार देशांनी वाटाघाटीचे प्रयत्न केले. अमेरिका, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तानचा या गटात समावेश आहे. शांतता चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या तोडगा मात्र निघू शकला नाही.
हल्ल्याचा निषेध
अफगाणिस्तानच्या राजधानीतील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. घटनेत अनेकांना आपल्या प्रियजनांना गमावावे लागले. पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो, असे पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या प्रतिक्रियांत म्हटले आहे.
‘भ्याड हल्ला ’
नवी दिल्ली - काबूल हल्ल्यातील मृतांच्या नातेवाइकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांत्वन करण्यात आले. अफगाणिस्तानला पाठवलेल्या संदेशात त्यांनी हल्ल्याचा निषेध केला. हा भ्याड हल्ला आहे. घटनेतील जखमी तत्काळ बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असे मोदींनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या दुतावासाजवळ झाला स्फोट...
- गृहमंत्रालयाचे प्रवक्ते सिद्दीकी यांनी सांगितले की, स्फोट झाला त्या भागात अमेरिकेचे दुतावास आहे. तसेच परराष्‍ट्र मंत्रालय व मिलिटरी ऑफिस आहे.
- अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.
- पूल-ए-मेहमूद खान भागात हा स्फोट झाला होता. तीन किलोमीटर अंतरावर भारतीय दुतावास आहे.
- रॉयटर्स न्यूज एजन्सीनुसार, मंगळवारी सकाळी मध्य काबूलमध्ये ढगात धुराचे लोट पसरले होते.
- अमेरिकन दुतावासातून सायरन वाजत होता.
- अमेरिकन दुतावासातील सर्वजण सुरक्षित असल्याचे नाटो मिलिटरीच्या सूत्रांनी सांगितले आहे.
- अमेरिकन दुतावासाजवळ नाटो मिलिटरीचे मुख्यालय आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, काबूरमधील शक्तिशाली स्फोटाची भीषणता दर्शवणारे फोटो...