आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानात शिया, सुन्नी मशिदीत हल्ला, 72 जण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल- अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील गोर प्रांतात सुन्नी मशीद व काबूलमध्ये शुक्रवारी रात्री शिया मशिदीवर आत्मघातकी हल्ला झाला. त्यात एकूण ७२ जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी लोक जमले होते. त्याच वेळी आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला उडवून लावले. त्यात ३३ जणांचा मृत्यू झाला. हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. काबूलच्या पश्चिमेकडील दश्ते-ए-बारमध्ये इमाम जामान मशिदीत झालेल्या हल्ल्यात ३९ जणांचा मृत्यू झाला. त्यात ४५ जण जखमी झाले. गुरुवारी कंदहार प्रांतात सैन्याच्या तळावर झालेल्या हल्ल्यात अफगाणिस्तान सुरक्षा दलाच्या ५८ सैनिकांचा मृत्यू झाला होता. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी हल्ला अत्यंत अमानुष असून त्याच्याविरोधात लष्करी मोहीम सुरूच राहील, असे स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार अफगाणिस्तानात यावर्षी शिया मशिदींवर झालेल्या हल्ल्यांत ८४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १९४ जण जखमी झाले.   
बातम्या आणखी आहेत...