आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी इतका मॉडर्न होता अफगाणिस्तान; ना बुर्खा होता ना बंदी, अशी होती LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अफगाणिस्तानातील हा फोटो 1960 च्या दशकातील आहे. - Divya Marathi
अफगाणिस्तानातील हा फोटो 1960 च्या दशकातील आहे.
इंटरनॅशनल डेस्क- अफगाणिस्तान देशाचे नाव समोर येताच मनात तालिबानचे नाव समोर येते. मात्र, कधी काळी अफगाणिस्तानातही लोक मॉडर्न लाईफस्टाईल्स जगत होते. शॉर्ट स्कर्ट, रस्त्यावर फिरणा-या लग्झरी कार आणि मुक्त व स्वतंत्र जीवन येथील लोक जगले. आज मात्र त्यांच्यासाठी स्वप्नासारखेच वाटत आहे. अफगाणिस्तान 1960 च्या दशकात खूपच मॉडर्न होता. तेव्हाची छायाचित्रे पाहताच आपल्याला त्या काळी अफगाण किती मॉडर्न होता हेच लक्षात आल्याशिवाय राहत नाही. 60 च्या दशकात अशी होती अफगाणी लोकांचे आयुष्य...
- अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या आधी तेथील लोकांचे आयुष्य एकमद छानछोके होते.
- 70 च्या दशकापूर्वी येथे ना कट्टरपंथी लोक होते ना कुठे खुनी हिंसा, संघर्ष होत होता.
- 1960 च्या दशकात अफगाणिस्तानातील लोकांच्या लाईफशी संबंधित फोटोज समोर आले होते.
- त्या वेळच्या लोकांची लाईफस्टाईल सध्याच्या काळापेक्षा खूपच वेगळी होती.
- या फोटोजद्वारे तुम्ही पाहू शकता तेव्हा येथील लोक किती शांततेने, आनंदाने जगत होते व वेस्टर्न लाईफस्टाईल फॉलो करत होते.
- हे फोटोज अरिझोना यूनिवर्सिटी प्रोफेसर डॉ. बिन पॉडिचने यांनी आपल्या कॅमे-यांनी कधी काळी कैद केली होती.
- पॉडिच आपली पत्नी मारग्रेट आणि दोन मुलींसह दोन वर्षे काबूलमध्ये राहिले होते.
कोण आहेत तालिबान?
- पश्तो शब्द तालिबपासून बनला आहे, तालिबान म्हणजे विद्यार्थी.
- तालिबान अफगाणिस्तानचा एक कट्टर इस्लामिक राजनैतिक आंदोलन आहे.
- 1996 ते 2001 या काळात अफगानणिस्तानात तालिबान सत्तेत राहिले. अमेरिकेने 7 ऑक्टोबर 2001 रोजी तालिबानविरोधात युद्ध सुरु केले.
- अमेरिकेने तालिबानला सत्तेतून हटविले. तेव्हापासून तेथे अमेरिकी लष्कर, युनोची शांतता सेना आणि परदेशी धार्जिण्या (अमेरिका पुरस्कृत) सरकारविरोधात तालिबान हिंसक लढाई लढत आहे.
- सत्तेत असताना तालिबानने कट्टर शरिया कायदा लागू केला होता. ज्यामुळे तेथील लोकांवर मुक्त जगण्यावर बंदी आली होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अफगाणिस्तानातील 60 च्या दशकातील फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...