आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कधीकाळी आफ्र‍िकेतून भारतात आले होते हे निग्रो, आज जगतायत अशी LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात राहणा-या सिद्दी आदिवासी मूळचे दक्षिण आफ्र‍िकेतील रहिवाशी आहेत. - Divya Marathi
भारतात राहणा-या सिद्दी आदिवासी मूळचे दक्षिण आफ्र‍िकेतील रहिवाशी आहेत.
भारत अनेक आदिवासी जमातींचे घर आहे. त्यांच्या चालीरिती व परंपरा देशाची समृध्‍द संस्कृती व वारशाला पुढे नेतात. यातील एक आहे सिद्दी आदिवासी. ते मूळचे दक्षिण आफ्र‍िकेतील बनतू जमातीतील आहेत. त्यांना पोर्तुगालने गुलाम बनवून भारतात आणले होते. भारतासह पाकिस्तानातही यांचे अस्तित्व आहे. भारतात यांची सर्वाधिक संख्‍या गुजरातमध्‍ये आहे. कुठे हब्शी तर कुठे शीदीस म्हणून ओळख...
- यातील काही लोकांनी इस्लाम व तर काहींनी ख्रिस्त धर्म स्वीकारलायं. फार कमी लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला.
- हे भारतासह आशियातील ब-याच देशांमध्‍ये फैलावले आहे.
- भारतात गुलाम म्हणून विकलेले हे आदिवासी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात.
- श्रीलंकेत हब्शी, काफीर आणि पाकिस्तानमध्‍ये शीदीस या नावाने ओळखले जातात.
- भारतात गुजरातमध्‍ये हे मोठ्या संख्‍येने राहतात. कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्‍ट्र या राज्यातही काही प्रमाणात त्यांचे वास्तव्य आहे.
- येथे सिद्दी जमातीची संख्‍या 50 ते 60 हजार आहे.
- विवाहाबाबत यांचे नियम कडक आहेत. सिद्दी आदिवासी आपल्याच जमातीत विवाह करतात.
- ते दुस-या जमातीत सहभागी होऊ इच्छित नाही. त्यांची शरीरयष्‍टीही आफ्र‍िकन प्रमाणे आहे.
सिद्दी आदिवासी कसे आले भारतात?
- पोर्तुगालने जुनागडचे राजासमोर सिद्दी आदिवासींचे काही गुलामांना सादर केले होते. त्यांची पिढी भारतात राहत आहे.
- जुनागडचा नवाब एकदा आफ्र‍िकेला आला होता व येथील महिलेच्या प्रेमात तो पडला, असे सांगितले जाते.
- नवाब जेव्हा आफ्रि‍कन महिलेला घेऊन भारतात परतले तेव्हा त्यांच्यासोबत शेकडो दाशाही आले. तेव्हापासून ते येथेच राहू लागले.
- इसवी सन 712 मध्‍ये भारतीय उपखंडात झालेल्या पहिल्या अरब मुस्लिमांच्या युध्‍दाच्या वेळी ते भारतात आले, असे म्हटले जाते.
सिद्दी आदिवासींचे ठिकाण गुजरात
- आता हे सिद्दी आदिवासी आफ्र‍िकन कमी तर जास्त गुजराती दिसतात.
- मात्र आजही ते संगीत व डान्ससह इतर आफ्र‍िकन परंपरा पाळतात.
- गिर जंगलाच्या मधोमध 'जंबूर' नावाच्या गावात हे राहतात. याला गुजरातचा आफ्र‍िका असे संबोधले जाते.
- गिरच्या प्राण्‍यासोबत खास करुन सिंहांशी त्यांचे खूप जुने नाते आहे.
- पर्यटनाच्या काळात यांचे डान्स पाहण्‍याची मागणी खूप असते.
- ते सेलिब्रिटीजपेक्षा कमी नाहीत. त्यांना गुजरात पर्यटनाच्या व्हिडिओतही दाखवले आहे.
- फक्त गुजरातच नव्हे कर्नाटक, महाराष्‍ट्र आणि आंध्रप्रदेशातही छोट्या छोट्या गटात ते राहतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...