आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्जिकल स्ट्राइकनंतर 6 दिवसांनी आज EU मध्ये समोरा-समोर येणार भारत-पाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रसेल्समध्ये अफगाणिस्तानात दोन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. - Divya Marathi
ब्रसेल्समध्ये अफगाणिस्तानात दोन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे.
ब्रसेल्स - भारत-पाकिस्तान बुधवारी ब्रसेल्ममध्ये समोरासमोर असेल. उरी आणि सर्जिकल स्ट्राइकनंतर भारत पाकिस्तान एखाद्या कार्यक्रमात एकत्र असण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर आणि नवाज शरीफ यांचे परराष्ट्र प्रकरणांचे सल्लागार सरताज अजिज ब्रसेल्समध्ये अफगाणिस्तान विषयावर होणाऱ्या परिषदेत सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत.
दरम्यान पाकने केलेल्या दाव्यानुसार EU ने काश्मिरमधील सद्य स्थितीसह नुकत्याच घडलेल्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. EU ने सर्जिकल स्ट्राइकचा सपोर्टही केला आहे. कॉन्फरन्स अफगानिस्तान आणि युरोपीय युनियनने आयोजित केली आहे.
कॉन्फरन्समध्ये 70 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत..
- या परिषदेत 30 संघटना आणि 70 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यात अफगाणिस्तानचे प्रेसिडेंट अशरफ गनी, सीईओ डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला हेही सहभागी होतील.
- कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठीएमजे अकबर आणि सरताज अजिज ब्रसेल्समध्ये उपस्थित आहेत.
- भारत, अफगानिस्तान, पाकिस्तान, ईराण, अमेरिका, रशिया आणि चीन यांच्या एका बैठकीचे नियोजनही केले जात आहे.
- नुकत्याच झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकच्या प्रतिनिधींनाही चर्चेची संधी मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...