आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी हवाई हल्ल्यानंतर ३ शहरे अल-कायदाच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अदेन- डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्रे हाती घेताच येमेनमधील दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार हवाई कारवाई केली. त्यामुळे खवळलेल्या अल-कायदाने हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी येमेनमधील तीन शहरे ताब्यात घेतली आहेत. ट्रम्प सत्तेवर आल्यानंतरची ही पहिलीच थेट लढाई आणि दहशतवाद्यांवरील पहिलाच प्रहार आहे. 
 
अल-कायदाने अब्यान प्रांतातील लॉडर, शाकरा, अहवार या शहरांवर हल्ला करून त्यावर वर्चस्व मिळवले आहे. अमेरिकेने रविवारी हवाई कारवाई केली होती. त्यात अनेक नागरिकांचाही मृत्यू झाला. अब्यान प्रांतावर दहशतवाद्यांचे अनेक दिवसांपासून वर्चस्व राहिले आहे. दहशतवाद्यांनी लॉडर, शाकरा शहरावर गुरुवारी यशस्वी हल्ला केला. अल-कायदाच्या लढवय्यांनी शहराच्या भाेवती अडथळे निर्माण केले. त्याचबरोबर सुरक्षा दलाच्या अनेक इमारतींना पेटवून दिले.
  
सौदीच्या हवाई दलाने दहशतवाद्यांना हुसकावण्याचा  प्रयत्न केला. लॉडर शहराजवळ गुरुवारी रात्री सौदीने अल-कायदाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करताना कारवाई  केली. संघर्षामुळे दहशतवादी आता झिंजिबार शहरावर चाल करून जाण्याचा धोका आदिवासी सूत्रांनी व्यक्त केला आहे. झिंजिबार हे शहर येमेनच्या दुसऱ्या क्रमांकाच्या अदेनपासून ५० किलोमीटर अंतरावर असल्याने सुरक्षेचा प्रश्न आहे. 
बातम्या आणखी आहेत...