आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हैतीमध्ये समुद्री वादळाने घेतला 339 जणांंचा बळी, जेरेमी शहर उद्ध्वस्त, 3,800 उड्डाणे रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्ट-ओ-प्रिंस- कॅरेबियन देश हैतीमध्ये आलेले समुद्री वादळ 'मॅथ्यू'ने 339 लोकांचा बळी घेतला आहे. पेनिनसुला (प्रायद्वीप) मधील सर्वात महत्त्वाचे शहर जेरेमी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. जवळपास 80 टक्के घरे जमिनदोस्त झाले असून हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दक्षिण भागात असलेल्या सूदमध्येही 30 हजार घरांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी प्रेसिडेंट इलेक्शन पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अमेरिकेलाही चक्रीवादळाचा जबर फटका बसला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी प्रशासनाने आणीबाणी घोषित केली आहे.

अमेरिकेत 3,800 उड्डाणे रद्द
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून 3,862 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शनिवारपर्यंत येथील विमान सेवा बंद असणार आहे. प्रशासनाने दक्षिण-पूर्व किनार्‍यावरील जवळपास 30 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

शतकातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ
- हैतीचे इंटीरियर मिनिस्ट्रीचे स्पोक्सपर्सन अल्बर्ट मोलेन यांनी सांगितले की, अनेक मोठ्या शहरांचा संपर्क तुटला आहे. मोठे नुकसान झाले आहे. दशकातील हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही मोलेन यांनी व्यक्त केली आहे.

7 लाखांहून जास्त जनतेला मॅथ्यूचा फटका...
- मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी हे वादळ हैती आणि क्यूबाच्या सागरी किनार्‍यावर धडकले. ताशी 230 km वेगाचा वारा आणि त्यात वादळी पावसाने होत्याचे नव्हते केले.
- मॅथ्यूमुळे 80 टक्क्यांहून जास्त नुकसान झाल्याचे हैतीच्या शासकीय सूत्रांनी यूएन ऑफिशियल्सच्या मीटिंगमध्ये सांगितले.
- देशातील तब्बल सात लाख लोकांना या समुद्री वादळाचा फटका बसला आहे. बहुतांश लोक ढिगार्‍याखाली गाडली गेली आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु झाले आहे.
- राजधानी पोर्ट-ओ-प्रिंसमध्ये पूल कोसळ्ल्याने मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
- मॅथ्यूमुळे बहामास आणि डोमनिक रिपब्लिकला देखील नुकसान झाले आहे.

फ्लोरिडाकडे वळले चक्रीवादळ..
- चक्रीवादळ आता अमेरिकेतील फ्लोरिडा या राज्याच्या दिशेने वळले आहे.
- फ्लोरिडाचे राज्यपाल रिक स्कॉट यांनी राज्यातील जनतेला सतर्क राहाण्यास सांगितले आहे.
- फ्लोरिडाच्या सागरी किणार्‍यावर 'मॅथ्यु' ताशी 205 Km वेगाने धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्लोरिडामध्ये आणीबाणी घोषित केली आहे.


पुढील स्लाइड्‍सवर पाहा, चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या हैतीमधील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...