आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पनामानंतर आता पॅराडाइज पेपर्स लीक, अमिताभ, जयंत सिन्हा, माल्यासह 714 भारतीयांची नावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या यादीत अमिताभ बरोबरच मान्यता आणि माल्या यांचीही नावे असल्याची माहिती आहे. (फाइल फोटो) - Divya Marathi
या यादीत अमिताभ बरोबरच मान्यता आणि माल्या यांचीही नावे असल्याची माहिती आहे. (फाइल फोटो)
वॉशिंग्टन - पॅराडाइज पेपर्सने जगातील अनेक नेते, सेलिब्रिटी आणि दिग्गजांची परदेशात (टॅक्स हेवन कंट्रीज) गुंतवणूक केल्याचा खुलासा केला आहे. 'द इंडियन एक्सप्रेस' च्या बातमीनुसार अमिताभ बच्चनसह 714 भारतीयांनी अशी गुंतवणूक केली आहे. अमिताभ यांचे नाव पनामा पेपर्समध्येही आले होते. रिपोर्टमध्ये 180 देशांचा समावश आहेत. त्यात नावांनुसार भारत 19व्या क्रमांकावर आहे. जयंत सिन्हांवरही आरोप लावण्यात आले आहेत. रिपोर्टमध्ये ज्या ओमिडयार नेटवर्कचा उल्लेख आहे, त्याच्याशी जयंत पूर्वी संलग्न होते. त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. हा खुलासा अमेरिकेच्या  इंटरनेशनल कंसोर्शियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स (ICIJ) पॅराडाइज पेपर्समध्ये करण्यात आला आहे. ICIJ नेच गेल्यावर्षी पनामा पेपर्सच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे खुलासे केले होते. 

प्रश्नोत्तरातून जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.. 
Q: कसे समोर आले प्रकरण?
A:
हे आतापर्यंतचे सर्वात मोठे फायनान्शियल डाटा लीक असल्याचे सांगितले जात आहे. बरमुडाची फर्म Appleby आणि सिंगापूरच्या Asiaciti सह जगातील 19 टॅक्स हेवन्स कंट्रीजमध्ये प्रभावशाली आणि सेलिब्रिटीच्या गुंतवणुकीचा तपास करण्यात आला. 
- या यादीत भारत 180 देशांमध्ये 19 व्या क्रमांकावर आहे. 

Q: कोणत्या फर्मचे डॉक्युमेंट्स सर्वात जास्त? 
A:
ज्या डॉक्युमेंट्सची तपासणी करण्यात आली आहे, त्यापैकी सर्वाधिक बरमुडाची लॉ फर्म Appleby चे आहेत. 
- 119 वर्षे जुन्या असलेल्या या कंपनीत वकील, अकाउंटंट्स, बँकर्स आणि इतर लोकांचे नेटवर्क आहे. या नेटवर्कमध्ये अशा लोकांचाही समावेश आहे, जे विदेशांत कंपन्या स्थापन करतात आणि त्यांचे बँक अकाऊंट्स मॅनेज करतात. 

Q: कोणत्या भारतीयांची किंवा भारतीय फर्मची नावे?
A:
या लिस्टमध्ये एकूण 714 भारतीयांची नावे आहेत. त्यात अमिताभ बच्चन, केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा, भाजप खासदार रवींद्र किशोर सिन्हा, कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया आणि संजय दत्तची पत्नी मान्यता (दिलनशीं नावाने) यांचा समावेश आहे. 
- सन टीव्ही (एअरसेल-मॅक्सिस केस), एस्सार-लूप (2जी केस), SNC लावलिन (यात केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन यांचे नावही आले होते. पण नंतर ते नाव हटवण्यात आले) यांचे नावही आहे. 
 
Q: भारतातील दिग्गजांवर कोणते आहेत आरोप.. 
A:
अमिताभ बच्चन- त्यांनी 2004 च्या लिबरलाइज्ड रेमिटेन्स स्कीमच्या आधी बरमुडाच्या एका कंपनीच पैसे गुंतवले. 
- जयंत सिन्हा : Omidyar Network ने D.Light Disign मध्ये गुंतवणूक केले. D.Light त्यांच्या सब्सिडिअरी केमन आयलँड्सद्वारे 30 लाख डॉलरचे लोन घेतले होते. रेकॉर्ड्सनुसार ते डी.लाइटमध्ये डायरेक्टर होते. 2006 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये डी.लाइटची स्थापना झाली होती. 
- भाजपचे राज्ययबा खासदार आरके सिन्हा : त्यांचेही अनेक ऑफशोर कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचे डॉक्युमेंट्स मिळाले आहेत. सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हीस (SIS) चे फाउंडर असलेली सिन्हा यांचे नाव माल्टा लिस्टमध्येही आहे. 
- विजय माल्या : Appleby च्या डॉक्युमेंट्सनुसार माल्यांच्या युनायटेड स्पिरिट इंडिया (USI) ने ऑफशोर कंपन्यांकडून लाखों डॉलरचे कर्ज घेतले. 
- सन ग्रुप : नंदलाल खेमका यांनी स्थापन केली होती. ही कंपनी Appleby ची जगातील सर्वात मोठी क्लाइंट होती असे सांगण्यात येते. 

Q: जयंत सिन्हा काय म्हणाले?
A:
मी इंडियन एक्सप्रेसला संपूर्ण माहिती दिली आहे. मी ओमिड्यार नेटवर्क आणि त्यांच्याशी संलग्न डी.लाइटच्या संचालकीय मंडळात होते. पण सर्व व्यवहार कायदेशीर होते. त्याची माहिती अथॉरिटीजला देण्यात आली होती. 
- ओमिडयार सोडल्यानंतर मला डी.लाइट बोर्डातील इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून काम करण्यास सांगितले. पण केंद्रीय मंत्री बनल्यानंतर मी लगेचच राजीनामा दिला. 

Q: जगातील कोणत्या प्रभावी लोकांचा समावेश?
A:
ट्रम्प यांचे परराष्ट्र आणि वाणिज्य मंत्री यांच्यासह 13 अधिकारी. ब्रिटनची राणी क्वीन एलिजाबेथ II, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासाठी पैसा गोळा करणारे स्टीफन ब्रोनफमॅन. 
- याशिवाय पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शौकत अजिजसह जगभरातील 120 नेते. 
 
Q: काय आहे पॅराडाइज पेपर्स, किती डॉक्यमेंट्स मिळाले?
A
: जर्मन वृत्तपत्र Süddeutsche Zeitung यांना बरमुडाच्या Appleby कंपनीचे, सिंगापूरच्या Asiaciti ट्रस्ट आणि टॅक्स चोरी करणाऱ्यांसाठी स्वर्ग समजल्या जाणाऱ्या 19 देशांमध्ये करण्यात आलेल्या कार्पोरेट रजिस्ट्रिंशी संबंधित एक कोटी 34 लाख डॉक्युमेंट्स मिळाले. 
- Süddeutsche Zeitung याच वृत्तपत्राने 18 महिन्यांपूर्वी पनामा पेपर्सचा खुलासा केला होता. 
- जर्मन वृत्तपत्राने हे काम इंटरनॅशनल कंसोर्शियम ऑफ इनव्हेस्टीगेटिव्ह जर्नलिस्ट्स ( ICIJ ) च्या मदतीने केले. 
- ICIJ ने त्यांच्या वेबसाइटवरही जस्तऐवजांची तपासणी केल्यानंतर समोर आलेल्या विविध नावांची यादी जारी केली. ती www.icij.org वरही उपलब्ध आहे. (सविस्तर वाचा)
 
Q: किती दिवस चालला तपास?
A:
10 महिन्यांपेक्षा जास्त. 40 इनव्हेस्टीगेटिव्ह रिपोर्टमध्ये पब्लिश केले जाणार आहे. 
 
Q: Appleby काय आह?
A:
119 वर्षे जुनी लीगल फर्म आहे. 1980 मध्ये मेजर रेगिनाल्ड यांनी सुरू केली होती. 
- ती जगभरातील कंपन्या, आर्थिक इन्स्टीट्यूटस, सेलिब्रिटीज आणि श्रीमंतांना सल्ला देते. 
- या कंपनीत 740 एम्प्लॉइज काम करतात. या कंपन्यांकडे 200 वकील आणि 60 हून अधिक पार्टनर आहेत. 10 देशांत ऑफिसेस आहेत. 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...