आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकुफो यांना तिसऱ्या प्रयत्नानंतर मिळाले घानाचे राष्ट्राध्यक्षपद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्रा - आफ्रिकेतील घानामध्ये राष्ट्राध्यक्षपदावर दोन वेळा पराभूत झालेले नाना आकुफो-आडो अखेर तिसऱ्यांदा विजयी झाले. राष्ट्राध्यक्षपदासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया झाली. त्यात ६८.६२ टक्के मतदान झाले होते.

विद्यमान राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांना ४४. ४० टक्के, नाना आकुफो यांना ५३.८५ टक्के मते मिळाली. राष्ट्राध्यक्ष महामा यांनी पराभव स्वीकारला. आकुफो १९४४ मध्ये जन्मलेले न्यू पॅट्रियॉटिक पार्टीचे नेते आहेत. घानामधील हे मोठे नाव आहे. देशाच्या सहा संस्थापक नेत्यांपैकी तीन नेते त्यांचे नातेवाईक आहेत. त्यांचे वडील एडवर्ड देशाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती आहेत. त्यांनी १९६९ ते १९७२ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदाचीदेखील जबाबदारी सांभाळली होती. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत नाना आकुफो यांनी आपल्या पक्षाच्या जॉन कुफोर यांना रिंगणात उतरवले होते.
बातम्या आणखी आहेत...