आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेस्तराँमध्ये स्तनपान करवून संताप व्यक्त, हंगेरीमध्ये हक्कासाठी महिलांची एकजूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुडापेस्ट - हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये शुक्रवारी मॅकडोनाल्डच्या आउटलेटमध्ये अनेक माता अचानक दाखल झाल्या आणि त्यांनी एकाच वेळी आपल्या बालकांना स्तनपान करवले. त्या वेळी उपस्थितांना हे चालले तरी काय, हेच उमगत नव्हते.
हे प्रकरण सोशल मीडियातून जगासमोर आले होते. एरिका यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. सकाळी ९ च्या सुमारास मी बाळाला खाऊ घालून घराबाहेर पडले होते. परंतु बाळाला पुन्हा भूक लागली. त्या वेळी हवेत उष्णताही होती. तापमान ३० अंश सेल्सियस होते. अगदीच रस्त्यावर स्तनपान करण्यापेक्षा मॅकडोनाल्ड्समध्ये जाऊन दूध पाजण्याचा विचार केला. तेथे एक शांत आणि हवेशीर जागा शोधली, जेणेकरून बाळाला आणि इतर कोणालाही त्रास होणार नव्हता. त्यासाठी एका वेट्रेसचीदेखील परवानगी घेतली होती. तिने परवानगी दिली, परंतु एका सुरक्षा रक्षकाने तिला मनाई केली. सुरक्षा रक्षकाने व्यवस्थापकांशी चर्चा केली आणि पुन्हा मला रोखले. बाहेर जाण्यास सांगितले.

एरिकाने ही हकिगत आपल्या मैत्रिणीला आणि फेसबुकवर पोस्ट केली होती. सोशल मीडियावर ही कहाणी आगीच्या वणव्यासारखी पसरली. शुक्रवारी डझनभर महिला बुडापेस्टच्या पश्चिमेकडील रेल्वेस्थानकावर दाखल झाल्या. त्यांनी तेथे मॅकडोनाल्ड्स रेस्तराँमध्ये बसून आपल्या बाळांना स्तनपान केले आणि रेस्तराँच्या विरोधात आंदोलन केले. अशा प्रकारची वागणूक मिळते म्हणूनच हंगेरीत महिला नवजात बाळांना घेऊन बाहेर पडत नाहीत. कारण त्यांना योग्य सन्मानाची वागणूक मिळत नाही. एरिका यांच्या म्हणण्यानुसार एकाच वेळी एवढ्या महिला एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यातून एकजूट दिसून आली. हे चित्र खरोखरच अद्भुत होते. हा विरोध एका चांगल्या कारणासाठी आणि शांततामय मार्गाने करण्यात आला होता.

घटनेस सुरक्षा रक्षक जबाबदार असल्याचे मॅकडोनाल्ड्सने जारी केलेल्या पत्रकातून म्हटले आहे. मॅकडोनाल्ड्स रेस्तराँमध्ये महिला स्तनपान करू शकतात. कारण रेस्तराँची धोरणे कुटुंबास अनुकूल असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे घटनेची कार्यालयीन पातळीवर चाैकशी केली जावी, अशी मागणीही होत आहे.