आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगऱ्यात दु:खी डायनाला पाहून शूज डिझायनरला प्रेरणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- १९९२ मध्ये युवराज्ञी डायना भारत भेटीवर आल्या होत्या. त्या वेळी ताजमहाल समोर बसून डायनाने काढलेला फोटो खूप चर्चेत होता. त्या खूप दु:खी असल्याच्या बातम्या तेव्हा प्रसारमाध्यमातून प्रकाशित झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी फ्रान्सचे क्रिश्चिया लुबुतें यांनी पम्स (हलकी जुती) तयार केली होती. लुबुतें यांनी डिझाइन केलेली ती पहिली जुती होती. अलीकडेच आलेल्या माहितीपटातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
नेव्ही ब्ल्यू वेलवेंटने तयार करण्यात आलेली फ्लॅट सोलची जुती होती. जुतीवर एक लाल ग्रॉसरी रिबनने ‘एलआे’ तर दुसऱ्या पादत्राणावर ‘व्हिई’अशी इंग्रजी मुळाक्षरे लिहिलेली होती. अर्थात दोन्ही मिळून लव्ह असा शब्द दिसत होता. त्यानंतर मी फुटवेअर तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. तो चालू लागला. मी डिझाइन केलेले फुटवेअर जगातील प्रसिद्ध व्यक्ती परिधान करतात.