टेक्सास - घड्याळ बनवून जगभरात चर्चेत आलेला अमेरिकेती विद्यार्थी अहमद मोहम्मद लवकरच अमेरिका सोडणार आहे. तो शिक्षणासाठी कुटुंबासह कतारला जात आहे. अहमदला 'कतार फाऊंडेशन फॉर एज्युकेशन, सायन्स अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट'द्वारे स्कॉलरशिप मिळाली आहे. ती अहमदने स्वीकारली आहे.
कतारला जाण्याच्या निर्णयाबाबत अहमद म्हणाला की, कतार एक चांगली जागा आहे. मला दोहा आवडते. कारण ते एक आधुनिक शहर आहे. तेथे चांगल्या शाळा आणि शिक्षक आहेत. मी कतारमध्ये बरेच काही शिकेल असे मला वाटते.
अहमद चर्चेत का...
गेल्या महिन्यात 14 वर्षीय अहमदला घड्या बनवून शाळेत आणल्याने अटक करण्यात आली होती. ही घटना डलास कौंटीच्या इरविंग शहरातील होती. तो डिजिटल घड्याळ बनवून शाळेत घेऊन गेला होता. पण शिक्षकांच्या तक्रारीनंतर काही वेळातच टेक्सास पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली होती. नंतर मात्र त्याला सोडण्यात आले होते. शिक्षकाच्या मते त्याची घड्याळ बॉम्बसारखी दिसत होती. त्यामुळे पोलिसांना बोलावले होते. वादानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि फेसबूकचे मार्क झुकेरबर्ग यांच्यासारख्या अनेकांनी त्याला पाठिंबा दर्शवला होता.
पुढे वाचा, ओबामांनी व्हाइट हाऊससाठी मागितली होती घड्याळ...