आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमद मायदेशी कतारला परतणार, घड्याळाबाबत संशयावरून अमेरिकेत झाली होती अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयर्विंग (टेक्सास) - नवीन काही तरी करण्याचा ध्यास आणि अभियंता होण्याचे स्वप्न बाळगून आगळे-वेगळे डिजिटल घड्याळ तयार करणारा १४ वर्षीय अहमद मोहम्मद याने अमेरिकेत आलेल्या वाईट अनुभवानंतर काढता पाय घेतला आहे. त्याने शिक्षणासाठी अमेरिकेत न राहता कतारला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमद याने जेव्हा डिजिटल घड्याळ तयार केले तेव्हा ते शाळेत शिक्षकांना दाखवण्यासाठी नेले. मात्र, त्याच्या हातात असलेले हे सर्किट पाहून शिक्षकांना संशय आला आणि सारेच धास्तावले. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. पोलिसांना पाचारण करून त्याला अटकही करण्यात आली. जेव्हा खरा प्रकार स्पष्ट झाला तेव्हा मात्र अहमदवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला.

ओबामांनीही घेतली भेट : पोलिसांना चूक लक्षात आल्यानंतर अहमद याची निर्दोष मुक्तता झाली होती. फेसबुकाचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आिण दस्तुरखुद्द अध्यक्ष बराक ओबामा यांनीही यानंतर अहमदची दखल घेतली आणि भेटीचे निमंत्रण त्याला दिले होते. ओबामा-अहमद यांची भेट झाली. परंतु, अहमदच्या मनात अमेरिकी मानसिकतेबद्दलची नाराजी मात्र दूर झाली नाही. त्याने कतारला जाण्याचा निर्णय घेतला. तो आता कुटुंबीयांसह मायदेशी म्हणजे कतारला परतत आहे.

कतारची शिष्यवृत्ती
कतार फाउंडेशन फॉर एज्युकेशनने अहमदला शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. एवढेच नव्हे, ही शिष्यवृत्ती देऊन पुढील शिक्षणासाठी बोलावले आहे. हा प्रस्ताव स्वीकारून अहमद कुटुंबीयाने कतारला परतण्याचा निर्णय घेतला.