आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुणाचल प्रदेशमध्‍ये हवाईदलाचे एमआय- १७ व्ही ५ हेलिकॉप्टर कोसळले; सात जवानांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचीत्र - Divya Marathi
संग्रहित छायाचीत्र
तवांग- हवाईदलाचे एमआय- १७ व्ही ५ हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी ६ वाजता अरुणाचल प्रदेशच्या पटोगरमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. हेलिकॉप्टरमधील सर्व सात जवानांचा जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पायलटसह हवाईदलाचे पाच व लष्कराच्या दोन जवानांचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानुसार, हेलिकॉप्टरमधील जवानांना लष्कराच्या चौकीवर केरोसीनचे कॅन टाकायचे होते. यादरम्यान जेरीकॅन उघडले व  हेलिकॉप्टरच्या टेल रोटरमध्ये(मागचा पंखा) अडकले. यामुळे ही दुर्घटना घडली. हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. सर्व जवानांचे पार्थिव सापडले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...