आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35,000 फुट उंचीवर विमानाचे असे हाल, आत होते 520 प्रवासी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - पॅरिस ते लॉस एंजेलिस जाणाऱ्या एअर फ्रान्सच्या सुपरजंबो प्रवासी विमानाचे इंजिन हवेतच खराब झाले. त्यामुळे विमानाची एमरजंसी लॅन्डिंग करावी लागली. 520 प्रवाश्यांनी भरलेले हे विमान 35 हजार फुट उंचीवर अटलांटिक महासागरावरून उडत होते त्याचवेळी इंजिनचे तुकडे पडले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. 
 
 
- इंजिन बिघडल्याने ग्रीनलंडवरून उडणाऱ्या विमानाचा रूट बदलण्यात आला. तसेच विमानाची एमरजेंसी लॅन्डिंग गूज विमानतळावर करण्यात आली. 
- वृत्तसंस्थेने प्रवाश्याचा दाखला देत सांगितल्याप्रमाणे, सर्वच प्रवाश्यांना अचानक मोठा आवाज आला. केवळ आवाजच नव्हता, तर त्यावेळी विमानही पूर्णपणे हालले होते. 
- साराह एमिग नावाच्या एका पॅसेंजरने स्थानिक माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, अख्ख्या विमानात हादरे बसत होते. हजारो फुट उंचीवर असलेले विमान अचानक खाली जात होते. त्याचवेळी एक प्रवासी मोठ्याने ओरडला. तेव्हाच काही तरी चुकीचे घडल्याचे सर्वांच्या लक्षात आले. 
- कॅबिन क्रू सदस्य सुद्धा इकडे-तिकडे धावत सुटले. काही वेळातच वैमानिकाने इंजिन ब्लास्ट झाल्याची घोषणा केली. 
 

एअर फ्रान्सचे प्रवक्ते म्हणाले...
एअर फ्रान्सच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट 066 चे इंजिन बिघडले होते. ग्रीनलंडवरून जात असताना हा प्रकार लक्षात आला. त्याचवेळी विमानाचा मार्ग बदलण्यात आला. विमानात कॅबिन क्रू आणि वैमानिकांसह 520 जण प्रवास करत होते. एअर फ्रान्सकडे 10 एअरबस ए-380 प्रवासी विमाने आहेत. हे जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान आहे. एखाद्या पक्ष्याने धडक दिली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, 35000 फुटांवरील त्या थराराचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...