आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्स विमान दुर्घटनाः उड्डाणानंतर 46 मिनिटांत कोसळले विमान, 148 मृत्युमुखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- दक्षिण फ्रान्समध्ये जर्मनविंग्स एयरलाइनचे प्रवासी विमान उड्डाण केल्यानंतर लगेच 46 मिनिटांत कोसळले. या विमानात 142 प्रवाशांसह 6 क्रू मेंबर्स होते. दुर्घटनाग्रस्त विमान बार्सिलोना येथून डूसेलडर्फ येथे जात होते. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सुआ ओलांद यांनी सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स ठार झाले असल्याचे सांगितले आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसपासून 750 किमोमीटर दूर अंतरावर घटनास्थळ आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिग्ने येथील एल्प्स पर्वतरागांमध्ये विमानाचे अवशेष आढळून आले आहेत. विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्सची काहीही माहिती मिळालेली नाही. परंतु, या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शंका वर्तवली जात आहे.
स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.39 वाजता विमान रडारवरुन बेपत्ता झाले होते. यावेळी विमान 6800 फुट उंचीवर उडत होते. जर्मन विंग्स एयरलाइन ही जर्मनीतील स्वस्तातील अत्यंत लोकप्रिय एअरलाईन्स आहे.
फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांनी दुर्घटना झाल्याचे सांगितले आहे. फ्रान्सचे गृहमंत्री घटनास्थळी पोहोचले आहेत. बचाव कामाचा ते आढावा घेत आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, जगाच्या नकाशात कुठे कोसळले विमान....