आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानाला 3 तास उशीर; प्रवाशांनी केली सामानाची मागणी;चेक-इन प्रक्रिया खोळंबली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनमध्येविमान प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. संगणक प्रणाली ठप्प झाली. त्यामुळे चेक-इन प्रक्रिया खोळंबली. त्यात ब्रिटिश एअरवेजची अनेक उड्डाणेही उशिरा झाली. याशिवाय लंडन सिटी विमानतळ परिसरात ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ची निदर्शने सुरू होती. त्यामुळेही वाहतुकीला गतिरोध निर्माण झाला. निदर्शक रनवेवरच आडवे पडले. त्यामुळे विमानतळ त्यांच्या ताब्यात गेल्यासारखे चित्र निर्माण झाले. विमान कंपनीने जाहीर माफी मागितली.

ब्रिटिश एअरवेजने दिलेल्या माहितीनुसार, लंडनच्या हिथ्रो गेटविक विमानतळांवर ग्राहकांची तपासणी सुरू होती. यादरम्यान संगणक प्रणालीत समस्या निर्माण झाली. त्यामुळे नेहमीपेक्षा या प्रक्रियेला अधिक वेळ लागला. विमान कंपनीने या दिरंगाईबद्दल ग्राहकांची जाहीर माफी मागितली. प्रवाशांनी विमानतळावर पोहोचण्यापूर्वी ऑनलाइन चेक-इनची प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले. ब्रिटिश एअरवेजच्या उड्डाणांना उशीर झाल्याने अमेरिकेतही पडसाद उमटले.

ब्लॅक लाइव्हज मॅटर ग्रुपची निर्मिती अमेरिकेत कृष्णवर्णीयांना पोलिसांनी लक्ष्य केल्यानंतर झाली. अाफ्रिकन-अमेरिकन समुदायाचे लोक याचे सदस्य आहेत. ब्रिटनसह अनेक देशांत यांच्या चळवळी सुरू आहेत. लंडन सिटी विमानतळ परिसरात त्यांनी निदर्शने केली. ब्रिटनच्या पर्यावरण स्थितीचा मुद्दा त्यांना ऐरणीवर आणायचा आहे. कृष्णवर्णीयांवर याचा विपरीत परिणाम होत असल्याने त्यांनी निदर्शने केली. ब्रिटनमध्ये श्वेतवर्णीयांच्या तुलनेत कृष्णवर्णीयांवर वायू प्रदूषणाचा प्रभाव २८ % अधिक होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. शुद्ध पर्यावरण या मुद्द्याला वांशिक बाजूही आहे. अशा स्थितीत कृष्णवर्णीय लोक विमान प्रवास करण्याऐवजी मृत्यू पत्करतील असे या गटाचे म्हणणे आहे.

^संगणक प्रणालीतबिघाड झाल्याने अमेरिकेत ब्रिटिश एअरवेजची उड्डाणे खोळंबली. डलासमध्ये पायलट गेटवर होते. मात्र प्रवासी अद्यापही चेक-इनच्या प्रक्रियेत अडकले होते. -जॉन बेविर

^डेन विमानतळब्रिटिश एअरवेजने आमचे सामान परत करावे. तास उशीर झालाय. -अॅना वॉल्टर्स
बातम्या आणखी आहेत...