आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 19 व्या वर्षी मिलियनेर बनला ब्रिटनचा अक्षय, कंपनीची व्हॅल्यू अब्जांमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारतीय वंशाच्या अक्षय रुपारेलिया वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ब्रिटनचा मिलियनेर बनला आहे. त्याच्या कंपनीची व्हॅल्यू वर्षभरातच 1.2 कोटी ब्रिटिश पाउंड अर्थातच 1.03 अब्ज रुपये एवढी झाली आहे. तो आपल्या शालेय शिक्षणासोबतच प्रॉपर्टी डील सुद्धा करतो. याच व्यवसायातून त्याने अब्जावधींची कमाई केली आहे. 
 

8.60 अब्ज रुपयांचे जमीन व्यवहार
- डेली मिररच्या एका वृत्तानुसार, अक्षयची कंपनी www.doorsteps.co.uk सुरू झाल्याच्या 16 महिन्यांत ब्रिटनच्या 18 सर्वात मोठ्या ऑनलाईन कंपन्यांच्या यादीत समाविष्ट झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्याच्या कंपनीने तब्बल 100 मिलियन पाउंड अर्थात जवळपास 8.60 अब्ज रुपयांचे जमीन व्यवहार केले आहेत. 
- अक्षयने एका नातेवाइकाकडून 7 हजार पाउंड उसणे घेऊन ही कंपनी सुरू केली. आता अक्षयच्या कंपनीमध्ये 12 लोक काम करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...