आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Al Shabab Terrorist Killed Kenya Students After Asking For Religion

केनिया हल्ला: धर्म विचारला, कुराण वाचायला लावले, त्यानंतर ख्रिश्चनांना घातल्या गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- केनियाच्या गॅरीसा विद्यापिठात विखुरलेले मृतदेह.)
नैरोबी (केनिया)- अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी गुरुवारी गॅरीसा विद्यापिठावर हल्ला केला तेव्हा धर्म विचारुन विद्यार्थ्यांना ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यातून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की दहशतवाद्यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना सोडले तर ख्रिश्चन विद्यार्थ्यांना गोळ्या घातल्या. एवढेच नव्हे तर मुस्लिम असल्याचे सांगणाऱ्या विद्यार्थ्यांना कुराण वाचण्यास सांगितले. जो वाचू शकत नव्हता त्याला लगेच गोळ्या घातल्या.
या हल्ल्याच्या वेळी सुदैवाने 600 विद्यार्थी पळण्यात यशस्वी झाले. या हल्ल्याचा मास्टरमाईंड महंमद कूनो असल्याचे सांगितले जात आहे. तो मदरस्यात शिक्षक होता. सरकारने त्याच्यावर 1.3 कोटी रुपयांचे बक्षिस आधीच जाहीर केले आहे.
या हल्ल्यातून बचावलेल्या अब्दुल रहमान याने वॉलस्ट्रिट जर्नलला सांगितले, की दहशतवाद्यांनी आम्हाला जमिनीवर लेटण्यास सांगितले. त्यानंतर एक दहशतवादी माझ्याजवळ आला. त्याने विचारले, की तू मुस्लिम आहे? मी म्हटले, की हो. त्यानंतर त्याने मला कुराण वाचायला सांगितले. मी आणि माझ्या मित्रांनी असेच केले. त्यानंतर त्यांनी आम्हाला सोडले. पण काही विद्यार्थ्यांना कुराण वाचता आले नाही. त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. काही विद्यार्थ्यांनी स्वतःला मृतदेहांखाली लपवून जीव वाचवला.
अशा घातल्या ख्रिश्चनांना गोळ्या
याबाबत 21 वर्षीय मॉरीन मानयेंगो म्हणाली, की दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांना पाय दुमडून गुडघ्यांवर बसण्यास सांगितले. दहशतवादी बनियान घालून होते. ते सोमालियाचे असावेत असे वाटत होते. त्यांनी ख्रिश्चन विद्यार्थ्यांना सांगितले, की ईस्टर हॉलिडे साजरा करण्यासाठी ते आले आहेत. मी कपडे ठेवण्याच्या आलमारीत लपून जीव वाचवला. यावेळी दहशतवादी विद्यार्थ्यांना म्हणत होते, की चिंता करु नका. सध्या आम्ही तुम्हाला मारत आहेत. जरा वेळाने आम्हीही मरणार आहोत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, दहशतवादी हल्ल्याचे अंगावर काटा उभा करणारे फोटो....