आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षाच्या मुलाने केले व्हेलचे तुकडे, फोटोज समोर येताच माजली खळबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हेल माशाच्या बॉडीजवळ उभा राहिलेला 16 वर्षाचा ख्रिस अपासिन्गॉक... - Divya Marathi
व्हेल माशाच्या बॉडीजवळ उभा राहिलेला 16 वर्षाचा ख्रिस अपासिन्गॉक...
इंटरनॅशनल डेस्क- अलास्कातील यूपिक गावात एका 16 वर्षाच्या मुलाने व्हेलचे केलेले शिकार प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. खरं तर गेल्या एप्रिल महिन्यात ख्रिस अपासिन्गॉकने किना-यावर पोहचलेल्या एका व्हेल माशाला आपल्या हापरून गनने मारले होते. यानंतर गाववाल्याच्या मदतीने त्या व्हेलला किना-यावर आणले गेले. ज्यानंतर गाववाल्यांनी त्या व्हेलचे अनेक दिवस मांस खाल्ले. क्रिसने फक्त व्हेलची शिकारच केली नाही तर व्हेलचे मांस कापण्यासाठी लोकांना मदत केली होती. आता मिळतेय जीवे मारण्याची धमकी....
 
- ख्रिसची आई सूसन आकापकने व्हेलच्या डेड बॉडीसमवेत आपले फोटोज काढत सोशल मिडियात शेयर केले होते.
- सूसनने मुलाचे फोटोज शेयर करत लिहले की, माझ्या मुलाने सा-या गावाच्या जेवणाची व्यवस्था केली.
- यानंतर हे फोटोज व्हायरल होत गेले आणि लोकांच्या निशाण्यावर ख्रिसच आला.
- एवढेच नव्हे तर, व्हेलला मारून खाल्ल्यामुळे काही लोकांनी ख्रिसला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 
- ख्रिसच्या आईच्या माहितीनुसार, या धमकीमुळे मागील काही दिवसापासून ख्रिस शाळेत जात नाहीये. 
- याबाबत ख्रिसच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, यात काहीही चुकीचे नाही. आम्ही लोक अशा भागात राहतो जेथे खाण्या-पिण्याची साधने खूपच सीमित आहेत. त्यामुळे सामान्यपणे आम्ही मासे आणि प्राणी- पशुंची शिकार करतो ज्यामुळे अनेक लोकांचे पोट भरते. येथे नेहमीच व्हेल माशाची शिकार केली जात असते.
 
ख्रिसच्या आईने फोटोज केले डिलीट-
 
- वाद पेटताच ख्रिसच्या आई सूसनने फेसबुकवर आपल्या मुलाचे शेयर केलेले फोटोज डिलीट करून टाकले. 
- मात्र, हे फोटोज खूपच मोठ्या प्रमाणात शेयर केल्याने मीडियातही चर्चेचा विषय ठरले आहेत.
- ख्रिसच्या आईने एका पोस्टमध्ये लिहले की, तिचा मुलगा हुशारच नाही तर बहादुर सुद्धा आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...