इटलीतील अल्बा अॅड्रिएटिका येथे सोमवारी दोन विमानांची धडक होऊन एक पायलट ठार झाला. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर सर्वाधिक पाहिला जात आहे.
पायलट टू-सिटर एअरक्राफ्टने नियमीत स्टंट करत होते. अल्बा अॅड्रिएटिका समुद्र किनाऱ्यावर हजारो लोक हा स्टंट पाहात होते, तर काही कॅमेरामध्ये कैद करत होते. रोमांचक आणि डोळ्यांच पारणे फेडणारा हा अनुभव थरारक होईल असे कोणालाही वाटत नव्हते. मात्र, पुढच्या काही क्षणातच त्याचे मोठ्या दुर्घटनेत रुपांतर झाले. पाहाता-पाहाता दोन विमाने एकमेकांना धडकली आणि एका विमानाचा चुराडा होऊन ते समुद्रात कोसळले तर दुसऱ्याचे क्रॅश लँडिग केले गेले.
या दुर्घटनेत 47 वर्षीय पायलट मार्को रिक्की याचे निधन झाले. त्याचा मृतदेह घटनास्थळापासून कित्येक किलोमीटर दूर समुद्र किनाऱ्यावर मिळाला. सुदैवाने दुसरा पायलट लुइगी विल्मो फ्रांसचेटी (43 वर्षे) याला किरकोळ दुखापत झाली.
या दुर्घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदारांपैकी एका व्यक्तीने सांगितले, की आम्ही समुद्रकिनाऱ्यावर फिरत होतो तर दोन विमाने फार खालून उड्डाण करत होती. त्यांचा वेगही बहुतेक कमी असावा. मग पुढच्याच क्षणी ते एकमेकांना धडकले त्याचा मोठा आवाज झाला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, विमान दुर्घटनेची क्रमशाः छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाइडवर व्हिडिओ